कोरोनाच्या नव्या विषाणूचा युरोपात थैमान, अनेक देशात लॉकडाऊन

कोरोनाचा विषाणू आणखी ताकदवान झाला आहे.

Updated: Dec 21, 2020, 07:11 PM IST
कोरोनाच्या नव्या विषाणूचा युरोपात थैमान, अनेक देशात लॉकडाऊन title=

बागेश्री कानडे, मुंबई : कोरोनाचा विषाणू आणखी ताकदवान झालाय. या नव्या विषाणूनं युरोपात थैमान घातलं असून ब्रिटनसह अनेक देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. सार्स कोव्ह-2 नावाचा हा विषाणब जगासाठी मोठा धोका झाला आहे.

कोरोनाचा विषाणू आणखी धोकादायक होत चालला आहे. इंग्लंडमध्ये कोरोनाच्या नव्या विषाणूचा कहर सुरू झाला आहे. कोरोनाचा हा विषाणू अधिक घातक असल्याचं सांगण्यात येतं आहे. हा विषाणू 70 टक्के अधिक वेगानं परसतो. इंग्लंडमध्येच कोरोनाच्य़ा या नव्या विषाणूचा उगम झाल्याचा अंदाज आहे. ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि युरोपातील काही देशात त्याचा वेगानं प्रसार झाला आहे. त्यामुळं युरोपातल्या अनेक देशांमध्ये 30 डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. 

सध्या कोरोनाच्या ज्या लसी बाजारात येऊ घातल्या आहेत त्या परिणामकारक असतील असं तज्ज्ञांचं मत आहे.

परदेशी प्रवाशांमार्फत भारतात हा धोकादायक विषाणू आल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं भारतीय आरोग्य यंत्रणेला विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.

कोरोनाच्या विषाणूच्या फैलावाला एक वर्ष होऊन गेलं आहे. कोरोनावर लस शोधली असली तरी कोरोनाचा नवा विषाणू जास्त घातक आहे. त्यामुळं येणारी लस आली किती परिणामकारक असणार याबाबत साशंकता आहे. त्यामुळे सातत्यानं हात धुळे, मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे.