मोदींनी 'या' देशांना सर्वतोपरी मदत करण्याचा दिला शब्द

कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगावर संकट 

Updated: Apr 17, 2020, 08:20 AM IST
मोदींनी 'या' देशांना सर्वतोपरी मदत करण्याचा दिला शब्द  title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बृहस्पतिवार यांना सांगितलं की,'भारत आणि मॉरीशस कायमच एकमेकांसोबत उभे राहणार. विशेष म्हणजे कोविड-19 या महामारीच्या वेळी देखील सोबत असणार. कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व मदतीसाठी आपण तयार असल्याचंही सांगितलं.'

मोदींनी मॉरीशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ आणि सेशेल्सचे राष्ट्रपती डॅनी फॉरे यांना ट्वीट करून उत्तर दिलं. प्रविंद जगन्नाथ यांनी कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी भारताने पाठवलेल्या मेडिकल गोष्टींसाठी आभार मानले आहे.  (Coronavirus : अमेरिकेकडून भारताला ५.९ मिलियन डॉलरची मदत)

यावर पंतप्रधान मोदींनी ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की,'पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ आपल्या नम्र शब्दांकरता धन्यवाद... भारत आणि मॉरीशरस इतिहास, संस्कृती, भाषा आणि हिंदी महासागराने जोडले गेले आहेत. आपण कायमच एकमेकांकरता सोबत राहूया. खासकरून अशा पद्धतीच्या प्रसंगी.' (कोरोना संकट : भारतात रॅपिड टेस्टसाठीच्या ५ लाख किट्स चीनमधून दाखल) 

 

जगन्नाथ यांनी देखील ट्विट करून संवाद साधाला. 'मी भारत सरकारचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आभारी आहे. त्यांनी उदार मनाने पुरवलेल्या वैद्यकीय पुरवठ्याबाबत. बुधवारी १५ एप्रिल रोजी ही मदत मॉरीशसमध्ये पोहोचली.' राष्ट्रपती फॉरे यांच्या कार्यालयातूनही ट्वीट करून आभार मानण्यात आले. या ट्विटला मोदींनी उत्तर दिलं आहे की,'राष्ट्रपती डॅनी फॉरे यांच्या नम्र शब्दांचा मी आभारी आहे. सेशेल्स आमच्या हिंदी महासागरातील एक महत्वपूर्ण सदस्य आहे. सुरक्षा आणि प्रगतीच्या दृष्टीकोनातून एक महत्वाचा स्तंभ आहे'. या शब्दांत मोदींनी त्यांच्या ट्विटला उत्तर दिलं.

Grateful to President Danny Faure for his kind words. Seychelles is a valued member of our Indian Ocean family, and an important pillar in our vision of Security and Growth for All in the Region. India will provide all possible support to Seychelles for fighting COVID-19. https://t.co/mZezWqsbfk

— Narendra Modi (@narendramodi) April 16, 2020

त्यांनी म्हटलं की, भारत कोविड 19 सोबत लढण्यासाठी सेशेल्सला आवश्यक ती सर्व मदत करणार असल्याचा शब्द देखील दिला.