या महिलेने चार महिन्यात कमावले 12500 करोडहून अधिक रुपये

एका महिलेने चार महिन्यात कमावले एवढे करोड रुपये की जाणून व्हाल थक्क.....

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Jan 8, 2018, 11:59 PM IST
या महिलेने चार महिन्यात कमावले 12500 करोडहून अधिक रुपये  title=

मुंबई : एका महिलेने चार महिन्यात कमावले एवढे करोड रुपये की जाणून व्हाल थक्क.....

चीनच्या या महिलेने 12,500 करोड रुपये कमावले आहे. ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सच्या माहितीनुसार यांग हूयांगचीनची पाचवी सर्वात अमिर व्यक्ती आहे. त्याचप्रमाणे देशातील सर्वात श्रीमंत महिला आहे. यांग हूयांग ही चीन ची कंट्री गार्डेन होल्डिंग्स कॉरपोरेशनची वाइस चेअरमन आहेत. वर्षाच्या पहिल्या 4 दिवसांत ट्रेडिंगच्या दरम्यान तिची संपत्ती 12,500 करोड रुपये फायदा झाला आहे. 

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या माहितीनुसार यांग ह्यूांगने 2005 मध्ये कंपनीमध्ये आपल्या वडिलांची जागा घेतली. यांग ह्यूयांगने आपल्या वडिलांच्या कंपनीला देशातील सर्वात मोठी कंस्ट्रक्शन कंपनी बनवली आहे. 

1992 मध्ये कंट्री गार्डेन होल्डिंग्स कॉरपोरेशन स्थापन करण्याअगोदर हिचे वडिल शेती करत असे. तिचे वडिल यांग गुओकियांग असून त्यांना यूंग क्वोक केंगच्या नावाने ओळखले जात असे. 1992 मध्ये कंट्री गार्डन होल्डिंग्सची स्थापना केली. ह्यूांगची संपत्ती वाढून 25.6 अरब डॉलर जवळपास 1.62 लाख करोड रुपयांहून अधिक झालं आहे. कंपनीने 2017 मध्ये आपल्या सेलच्या माहितीमध्ये सांगितले की, कंपनीने 550.8 यूआनचा बिझनेस केला आहे.