Covid-19: जुन्या व्हेरिएंटला कोरोनाचे हे नवे रुप करतेय गिळंकृत, जाणून घ्या किती धोकादायक

 कोविड -19 च्या नवीन  व्हेरिएंट  B.1.617.2 (Covid-19 New Variant) बाबत नवीन संशोधनानंतर तज्ज्ञांची चिंता वाढली आहे.  

Updated: May 26, 2021, 02:21 PM IST
Covid-19: जुन्या व्हेरिएंटला कोरोनाचे हे नवे रुप करतेय गिळंकृत, जाणून घ्या किती धोकादायक title=
संग्रहित छाया

मुंबई : भारतात कोरोना विषाणूची दुसरी लाट (Coronavirus 2nd Wave) हळू हळू कमी होण्यास सुरुवात झाली आहे आणि नवीन रुग्ण संख्येतही घट दिसून येत आहे.  यादरम्यान, कोविड -19 च्या नवीन  व्हेरिएंट  B.1.617.2 (Covid-19 New Variant) बाबत नवीन संशोधनानंतर तज्ज्ञांची चिंता वाढली आहे. कारण अन्य व्हेरिएंटला B.1.617.2 हा टेकओव्हर करत आहे. हा व्हेरिएंट नवीन रुपे धारण करत आहे.

यूकेमध्ये मिळालेल्या व्हेरिएंटला केले टेकओव्हर

Genome Sequencing तज्ज्ञांनी हे उघड केले आहे की, कोरोना विषाणूचा  B.1.617.2 स्ट्रेन ब्रिटनमध्ये पहिल्यांदा सापडलेला व्हेरिएंट  B.1.1.7लाही टेकओव्हर करत आहे. त्यानंतर भारतात प्रथमच सापडलेल्या B.1.617 याला   B1617.1, B1617.2 आणि   B.617.3 व्हेरिएंटला यूके मॉनिटर करत आहे.

कोरोनाचा नवा स्ट्रेन करतो जास्त संक्रमण 

कोविड-19चा B 1.617.2 म्यूटेंट सर्वात आधी भारतात महाराष्ट्रात सापडला. ब्रिटनमध्ये या म्यूटेंटला कोरोना विषाणूच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य इंग्लंडने (PHE) म्हटले की, त्याच्या ताज्या विश्लेषणावरुन असे दिसून आले आहे की, गेल्या आठवड्यात विषाणूचे अत्यंत वेगाने संसर्ग होत आहे. या प्रकाराने 520 लोकांना संसर्ग झाला होता. या आठवड्यात ही संख्या वाढून 1313 झाली. उत्तर-पश्चिम इंग्लंड आणि लंडनमध्ये बरेच याचे रुग्ण आढळून आले आहेत आणि संसर्गाचा हा वेग लवकर मोडीत काढण्यासाठी पावले उचलली जात आहेत.

B.1.617.2 या नव्या स्ट्रेनसाठी लसीचे दोन डोस आवश्यक 

यूकेच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, कोविड-19 मधील नवीन प्रकार B.1.617.2 मध्ये संसर्ग रोखण्यासाठी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. विभागाच्या मते, B.1.617.2 प्रकारात संसर्ग लसच्या पहिल्या डोसनंतर केवळ 33 टक्के संरक्षण प्रदान करतो, परंतु दोन्ही डोस घेतल्यानंतर 81 टक्के पर्यंत संरक्षण मिळते. यूके डिपार्टमेंट ऑफ हेल्थ आणि त्याच्या एक्झिक्युटिव युनिट पब्लिक हेल्थ इंग्लंड (पीएचई) यांनी ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्राजेनेका ही लस आणि फायझर-बायोनटेक या लसीच्या आधारे अभ्यास केला आहे.

WHOने व्यक्त केली चिंता 

जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) भारतात आढळलेल्या कोरोना विषाणूच्या B.1.617 विषयी चिंता व्यक्त केली आहे. डब्ल्यूएचओ सध्या याचा अधिक अभ्यास करीत आहे आणि जगभरात दिलेली लस या प्रकारावर किती परिणाम करेल हे समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. डब्ल्यूएचओच्या मते, जर विषाणूचा प्रसार थांबविला तर त्याचे म्यूटेशन देखील थांबेल.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x