नवी दिल्ली : जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरतोय. अनेक देश यासंदर्भात लस बनवण्याच्या प्रयत्नात आहेत. दरम्यान अमेरिकेतून (America) कोरोना वॅक्सिन संदर्भात आनंदाची बातमी समोर येतेय. ११ किंवा १२ डिसेंबरला कोरोना व्हॅक्सिनच्या (Corona Vaccine) लसीकरणाला अमेरिकेत सुरुवात होण्याची शक्यता आहे. व्हाईट हाऊसच्या (White House) कोरोना प्रमुखांनी याबाबत अधिकृत माहिती दिलीय आहे.
PFIZER कंपनीने कोरोनावरील लस बनवल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या लसीचा आपत्कालीन वापर करण्याची परवानगी त्यांनी मागितली आहे. १० तारखेला एफडीएची बैठक होणार आहे या बैठकीत लसीला याबाबत विचार करून ११किंवा १२ तारखेला कोरोनाची पहिली लस अमेरिकन नागरिकाला दिली जाण्याची शक्यता आहे.
यास मंजुरी मिळाल्यानंतर २४ तासांच्या आत लसीकरणामार्फत जनतेत पोहोचण्याचा प्रयत्न असल्याचे अमेरिकेत लसीकरण कार्यक्रमाचे प्रमुख मोनसेफ स्लाऊ यांनी सांगितले. १२ किंवा १२ डिसेंबरला हा कार्यक्रम सुरु होईल अशी शक्यता असल्याचेही ते पुढे म्हणाले.
फाइझर (Pfizer) ची जाहीर केलेली किंमत ही प्रति डोस १९.५० डॉलर (1446.17 रुपये) आणि मॉडर्ना (Moderna) ची किंमत २५ ते ३७ डॉलर (1854.07-2744.02 रुपये) ठेवण्यात आली आहे. म्हणजेच एका व्यक्तीच्या हिशोबाने वॅक्सिनची किंमत ३९ डॉलर (२८९२.३४ रुपये) आणि ५० ते ७४ डॉलर (३७०८.१३-५४८.०४ रुपये) असेल असं सांगण्यात येतय.