दोन महिन्यांनी बाहेर काढला बौद्ध भिक्षुंचा मृतदेह, फोटो पाहून सगळे हैराण

कोणत्याही व्यक्तीचा मृत्यु झाल्यावर दोन महिन्यांनी त्या व्यक्तीचा मृतदेह कसा होईल याची थोडीतरी कल्पना तुम्हाला असेलच.

Updated: Jan 25, 2018, 11:23 AM IST
दोन महिन्यांनी बाहेर काढला बौद्ध भिक्षुंचा मृतदेह, फोटो पाहून सगळे हैराण title=

बॅंकॉक : कोणत्याही व्यक्तीचा मृत्यु झाल्यावर दोन महिन्यांनी त्या व्यक्तीचा मृतदेह कसा होईल याची थोडीतरी कल्पना तुम्हाला असेलच. पण जर एखाद्या व्यक्तीचा मृतदेह दोन महिन्यांनी बाहेर काढल्यावर तसाच दिसेल तर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना! पण थायलंडमध्ये अशी एक घटना घडली आहे.

काय घडलं नेमकं?

थायलंडमध्ये एका बौद्ध भिक्षुकांचा मॄतदेह निधनाच्या दोन महिन्यांनंतर बाहेर काढला तर तो तसाच होता जसा दफन करतेवेळी होता. या घटनेचे काही फोटो सोशल मीडिया व्हायरल झाले असून या घटनेने जगभरात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बौद्ध गुरू लुआंग फोर पियान यांचें दोन महिन्यांपूर्वी ९२व्या वर्षी निधन झालं होतं. नुकताच त्यांचा मृतदेह काही कारणास्वत बाहेर काढण्यात आला तर जसा तो दफन करण्यात आला होता तसाच आढळला. हे बघून उपस्थितांनी आश्चर्य व्यक्त केलं. 

चेह-यावर हसू...

त्यांच्या चेह-या हसू दिसून आले. तसेच ते गार झोपेत असल्यासारखे दिसत आहेत. त्यांच्या शिष्यांचं म्हणनं आहे की, त्यांच्या चेह-यावरील हास्य हे त्यांना मोक्ष मिळाल्याकडे इशारा करतं. या घटनेचे फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.