डेथ व्हॅली, जगातील सर्वात भयानक ठिकाण; अंतराळातूनही दिसतो इथं जाणारा रस्ता

कॅलिफोर्नियातली डेथ व्हॅली हे जगातील सर्वात रहस्यमयी धोकादायक ठिकाण मानले जाते. इथे मनुष्य दूरच प्राण्यांचाही वावर दिसत नाही. 

Updated: Feb 25, 2024, 09:22 PM IST
डेथ व्हॅली, जगातील सर्वात भयानक ठिकाण; अंतराळातूनही दिसतो इथं जाणारा रस्ता title=

Death Valley National Park : जगात अशी बरीच ठिकाणं आहेत जी प्रचंड आव्हानात्मक आहेत. असच एक ठिकाण म्हणजे कॅलिफोर्नियातील डेथ व्हॅली. खरं तर हा एक 225 किलोमीटरचा रस्ता आहे. मात्र हाच रस्ता मृत्यूचा सापळा बनलाय. काय आहे आहे यामागचे कारण जाणून घेवूया.

मनुष्य वस्ती तर सोडाच, पण प्राणीदेखील दिसत नाहीत

कॅलिफोर्नियातली डेथ व्हॅली जगातील एक मोठ रहस्य मानले जाते. अमेरिकेतल्या नेवाडा राज्याच्या नैर्ऋत्येला कॅलिफोर्नियाजवळ हे ठिकाण. हा जगातला सर्वांत उष्ण प्रदेश मानला जातो. त्यामुळे तिथे मनुष्य वस्ती तर सोडाच, पण प्राणीदेखील दिसत नाहीत. या डेथ व्हॅलीतून जाणारा रस्तादेखील व्हॅलीप्रमाणेच गूढ आहे. 225 किलोमीटर लांबीचा सरळ रस्ता या व्हॅलीमधून गेला आहे. या रस्त्याचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यावर एकही वळण नाही. या रस्त्यावर एकही वळण नसल्यामुळे अगदी अंतराळातूनही तो रस्ता दिसतो. 

डेथ व्हॅलीतून जाणारा रस्तादेखील व्हॅलीप्रमाणेच गूढ

एखाद्याला या  रस्त्यावरून प्रवास करायचा असेल तर अगोदरच स्वतःसाठी खाद्यपदार्थ खरेदी करून ठेवावे लागतात. या रस्त्यावरून प्रवास करताना वेगाची मर्यादा नाही. मात्र या दुर्गम आणि निर्मनुष्य रस्त्यावर गाडी बिघडल्यास मोठी अडचण होऊ शकते. कारण तिथलं सामान्य तापमान 50 अंशांपेक्षा जास्त असतं. तिथल्या उष्णतेची अनेक कारणं आहेत. पॅसिफिक महासागरातून येणारे कोरडे वारे इथे पोहोचेपर्यंत गरम होतात. परिणामी तिथे फारच कमी पाऊस पडतो. शिवाय, हा भाग समुद्रसपाटीपासून खूप सखल असल्याने इथे उष्णता जास्त असते.

डेथ व्हॅलीची लांबी 225 किलोमीटर आणि रुंदी 8 ते 14 किलोमीटर आहे. ही रुंदी आपोआप कमी-जास्त होते. शास्त्रज्ञांनी इथे संशोधन केलं तेव्हा त्यांना अनेक मानवी आणि प्राण्यांचे सांगाडे सापडले. यानंतर, अमेरिकन सरकारने डेथ व्हॅलीमध्ये मरण पावलेल्यांच्या स्मरणार्थ 1933मध्ये या ठिकाणाला राष्ट्रीय स्मारक घोषित केलं.

डेथ व्हॅलीमध्ये पहायला मिळतात निसर्गाचे अप्रतिम चमत्कार

डेथ व्हॅलीमध्ये तुम्हाला निसर्गाचे अप्रतिम चमत्कार बघायला मिळतील. मात्र इथली उष्णता आपल्या शरीरातली पाण्याची पातळी झपाट्याने कमी करते. परिणामी फारच कमी जण तिथे जाण्याचं धाडस करतात. एका नोंदीनुसार, 15 जुलै 1972 रोजी तिथलं तापमान 89 अंश सेल्सिअसवर पोहोचलं होतं. डेथ व्हॅली नॅशनल पार्कमधून जाण्यासाठी सुमारे 30 ते 40 डॉलर्स प्रवेश शुल्क भरावं लागतं. या रस्त्यावर जातात तर येत मात्र तिथून तुम्ही नियोजित ठिकाणी पोहचाल याची खात्री नाही. म्हणूनच या इतक्या सुंदर रस्त्याला डेथ व्हॅली म्हंटलं जातं.