Do you know: जगातील असे दोन देश जिथे एकही मंदिर किंवा मशीद नाही

जगभरातील देशांमध्ये हिंदू आणि मुस्लिम धर्माच्या लोकांसाठी मंदिरे आणि मशिदी बांधल्या जातात. परंतु तुम्हाला हे माहित आहे का की जगात असे दोन देश आहेत जिथे ना मंदिरे आहेत ना मशिदी आहे. 

तेजश्री गायकवाड | Updated: Oct 18, 2024, 05:38 PM IST
Do you know: जगातील असे दोन देश जिथे एकही मंदिर किंवा मशीद नाही title=
Photo Credit: PTI

No Temple or Mosque: जगभरात हिंदू आणि मुस्लिम धर्माच्या अनुयायांची संख्या कोटींच्या घरात आहे.  मुस्लिम धर्माचे पालन करणाऱ्या लोकांची लोकसंख्या 172 दशलक्ष आहे, तर हिंदू धर्माचे पालन करणाऱ्या लोकांची लोकसंख्याही त्याहून खूप जास्त आहे. दोन्ही धर्मांचे पालन करणारे लोक जगभर आढळतील. त्या त्या धर्मानुसार जगभरात मंदिरे आणि मशिदी आहेत. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जगात असे दोन देश आहेत जिथे एकही मंदिर किंवा मशीद नाही. त्याबद्दल जाणून घेऊयात... 

भारतात किती मंदिरे आणि मशिदी आहेत?

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. आपल्या देशात अनेक प्रकारच्या धर्मांचे पालन करणारे लोक राहतात. आपल्या देशात हिंदू धर्माच्या लोकांची लोकसंख्या सुमारे 109 कोटी आहे. तर भारतात मुस्लिमांची संख्या सुमारे १७ कोटी आहे. भारतात मंदिरांची संख्या 20 लाखांपेक्षा जास्त आहे तर मशिदींची संख्या सुमारे 7 लाख आहे. जगभरात विविध देशांमध्ये अनेक मशिदी आणि मंदिरे बांधली गेली आहेत. पण असे दोन देश आहेत जिथे ना मंदिरे आहेत ना मशिदी आहेत. 

Indian Railway: 37 तास प्रवास, 111 स्टेशनवर थांबा; तरीही लोकांना 'या' ट्रेनचे हवे असते तिकीट

कोणत्या दोन देशात ना मंदिर ना मशीद? 

जगात असे दोन देश आहेत जिथे एकही मंदिर किंवा मशीद नाहीये. या देशांची नवे आहेत उत्तर कोरिया आणि व्हॅटिकन सिटी. 

उत्तर कोरिया

उत्तर कोरियातील ५२ टक्क्यांहून अधिक लोक कोणत्याही धर्माला मानत नाहीत. 32 टक्के ख्रिश्चन धर्माचे, 14 टक्के बौद्ध धर्माचे आणि 1 टक्के इतर धर्माचे अनुसरण करतात.

15 दिवसात बनवलेल्या या चित्रपटाने 1999 मध्ये दिली होती खळबळ उडवून, नायिकेला घाबरू लागले होते लोक

व्हॅटिकन सिटी

व्हॅटिकन सिटीमध्ये फक्त ख्रिश्चन धर्माचे अनुसरण करणारे लोक राहतात. व्हॅटिकन सिटी हे ख्रिश्चन धर्माचे अत्यंत पवित्र ठिकाण आहे. या देशाची खास गोष्ट म्हणजे हा जगातील सर्वात लहान देश आहे. जिथे जगभरातून लोक भेटायला येतात.