अमेरिकेला निघालात? आधी हे वाचा

तुम्ही जर अमेरिकेला जायचा विचार करत असाल तर, तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. कारण अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प सरकारने ग्रीन कार्ड प्रणालीत काही बदल केले आहेत. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना अमेरिकेला घेऊन जाणं थोडं जिकरीचं होणार आहे.

Updated: Oct 10, 2017, 01:02 PM IST
अमेरिकेला निघालात? आधी हे वाचा title=

मुंबई : तुम्ही जर अमेरिकेला जायचा विचार करत असाल तर, तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. कारण अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प सरकारने ग्रीन कार्ड प्रणालीत काही बदल केले आहेत. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना अमेरिकेला घेऊन जाणं थोडं जिकरीचं होणार आहे.

ट्रम्प सरकारनं स्थलांतर नियमावलीत बरेच बदल केले आहेत. त्यानुसार अतीउच्च कौशल्यांवर आधारीत व्यवस्था लागू करतानाच कुटुंबातील सदस्यांना सोबत नेण्यावर बंदीचा प्रस्ताव आहे. अभ्य़ास, प्रचंड पैसा यासाठी जर तुम्ही अमेरिकेला जाणार असाल तर तुम्हाला कुटुंबिय़ांना सोबत नेता येणार नाही. भारतीय माहिती तंत्रज्ञान कर्मचा-यांसाठी एच वन बी व्हिसा महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे देशाच्या ग्रीन कार्ड प्रणालीचा डोनाल्ड ट्रम्प यांनी आढावा घेतला.

अमेरिकेचं हीत जपण्यासाठी त्य़ांनी आढावा घेऊन हे नवे नियम लागू केलेत. स्थलांतर थांबवल्य़ाशिवाय अमेरिकी कामगार आणि करदात्यांवरचा बोजा कमी करता येणार नाही. सध्य़ाची स्थलांतर व्यवस्था अमेकिकेच्य़ा हिताची नाही असं मतही ट्रम्प यांनी नोंदवलं आहे. अतिउच्च कौशल्य असलेल्या भारतीय कामगारांनाच स्थलांतर नियम व्यवस्था लागू केली जाईल, असं ट्रम्प यांनी जाहीर केलंय. त्यामुळं आता अमेरिकेत जाताना एकटंच जायची तयारी ठेवा.