Viral News: जिम, थिएटर अन् बरंच काही, दुबईतील सर्वात महागडं घर विक्रीला काढलं, किंमत ऐकून धडकी भरेल

Dubai Most Expensive House For Sale: दुबईतील सर्वात महागडं घर विक्रीसाठी काढलं आहे. हे घर घेण्यासाठीच्या स्पर्धेत भारतीय देखील आहेत. या घराची वैशिष्ट्ये जाणून घ्या

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 15, 2023, 04:08 PM IST
Viral News: जिम, थिएटर अन् बरंच काही, दुबईतील सर्वात महागडं घर विक्रीला काढलं, किंमत ऐकून धडकी भरेल title=
Dubai most expensive home on sale for 204 million

Dubai Most Expensive House on Sale: दुबईतील सर्वात महागडे घर आता विक्रीसाठी उपलब्ध आहे. या घराची किंमत 750 दशलक्ष दिरम्स (204 मिलियन डॉलर) म्हणजे भारतीय रुपयांनुसार १ हजार ६७५ कोटी इतकी आहे. या घराच्या बांधणीसाठी इटालियन मार्बल्सचा वापर केला आहे. त्यामुळं या घराला मार्बल पॅलेस (Dubai Marble Palace) असंही म्हणतात. हॉलीवूडच्या ब्रेव्हरी हील्सच्या धर्तीवर एमिरेट्स हील्सवर ही दुबईतील सगळ्यात महागडी प्रोपर्टी उभी करण्यात आली आहे. Luxhabitat Sotheby's International Realty या घराची विक्री करणार आहे.  हे घर घेण्यासाठी भारतीयांमध्येही स्पर्धा लागली आहे. मात्र हे घरं खरेदी करणार हे मात्र अद्याप ठरलेले नाहीये. 

हाती आलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंतच्या इतिहासात सर्वात महागडे घर म्हणून यांची नोंद होणार आहे. ६०, ००० स्केअर फूटमध्ये घर बांधण्यात आलं आहे. तरीदेखील यात फक्त 5 बेडरुम आहेत. व १९ बाथरुमसोबतच एक जिम, थिएटर, जॅकुझई आणि एक बेसमेंट पार्किंग देण्यात आली आहे. इथे एकाचवेळी 15 गाड्या एकत्र पार्क करता येऊ शकतात. 

मार्बल पॅलेसच्या बांधणीसाठी जवळपास १२ वर्षे लागले होते. 2018मध्ये या घराचे बांधकाम पू्र्ण झाले. हे घर स्थापत्यशैलीचा एक उत्तम नमुना आहे. यात मुख्यतः १९ व २०व्या शतकातील कलाकृतींचा वापर करण्यात आला आहे. यात मूर्त्या, पेंटिग यांचा समावेश आहे. या घराचा मालक एक स्थानिक बिल्डर आहे मात्र, त्याने त्याचे नाव छापण्यास मनाई केली आहे. 

मार्बल पॅलेसचे ब्रोकर कुणाल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, संपू्र्ण जगात फक्त असे 10 जण आहेत जे हे घर खरेदी करु शकतात. मागच्या तीन आठवड्यांपासून दोन ग्राहक येऊन घर पाहून गेले आहेत. त्यातील एक ग्राहक रशियाचा आहे तर, दुसरा भारतीय आहे. घर बघण्यासाठी आलेल्या भारतीय नागरिकांकडे आधीपासून अमीराती हिल्समध्ये तीन प्रॉपर्टी आहेत.

मार्बल पॅलेसच्या तळमजल्यावर डायनिंग आणि थिएटरच्या रुम आहेत. तर, इनडोअर आणि आऊटडोअर स्विमिंग पूल आहेत. त्याचबरोबर दोन डोम असून 70,000 लीटर पाण्याचे कोरल रिफ अॅक्वेरिअम आहे. वीजेसाठी स्वतंत्र पॉवर सबस्टेशन आणि पॅनिक रुममही आहे. तसंच, घराच्या गार्डन एरियामध्ये 70 हजार स्वेअर फूटांचे गोल्फ कोर्स आहे. मार्बल पॅलेससाठी 80 ते 100 मिलीयन दिरहम इटालियन मार्बल वापरले आहे.