पृथ्वी मोठ्या संकटातून थोडक्यात बचावली; जर्मनीत धडकला लघुग्रह

Asteroid hits Germany : पृथ्वी पृथ्वी आठव्यांदा मोठ्या संकटातून बचावली आहे. जर्मनीत एका लघुग्रहाचा स्फोट झाला आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jan 24, 2024, 06:09 PM IST
 पृथ्वी मोठ्या संकटातून थोडक्यात बचावली; जर्मनीत धडकला लघुग्रह title=

Asteroid hitting Earth 2024: आपली पृथ्वी एका मोठ्या संकटातून थोडक्यात बचावली आहे. पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या लघुग्रहाचा जर्मनीची राजधानी असलेल्या बर्लिन शहरात स्फोट झाला आहे. यामुळे पृथ्वीवर होणारा मोठा विध्वंस टळला आहे. संशोधन सध्या या लघुग्रहाचे तुकडे गोळा करत आहेत. बर्लिन शहरावर आदळलेल्या या लघुग्रहाच्या तुकड्याचे संशोधन केले जाणार आहे. जगाच्या इतिहासात आठव्यांदा पृथ्वी लघुग्रहाच्या धडकेतुन बचावली आहे.

21 जानेवारी 2024 मध्ये या लघुग्रह पृथ्वीवर धडकला. जर्मनीची राजधानी बर्लिनजवळील लाइपझिग परिसरात  21 जानेवारी रोजी आकाशात अचानक एक तेजस्वी प्रकाश दिसून आला. संशोधकांनी तात्काळ याचा मागोवा घेतला. काही तासानंतर स्फोट होवून हा प्रकाशाचा गोळा आकाशात लुप्त झाला. 

उत्तर जर्मनीतील लीपझिग शहरातील नागरिकांनी उल्कासदृष्य वस्तू आकाशात पेट घेताना पाहिली. पाहता पाहता याचा स्फोट झाला. यानंतर ही उल्कासदृष्य वस्ती गायब झाली. अनेक नागरिकांनी आपल्या कॅमेऱ्यात हे सर्व रेकॉर्ड केले आहे. अवघ्या काही सेकंदात हे सर्व घडले. या लघुग्रहाची रुंदी 3.3 फूट आहे.  बर्लिन शहराजवळ जमिनीपासून सुमारे 50 किलोमीटर उंचीच्या आकाशात पश्चिम दिशेने हा लघुग्रह दिसला.

क्रिश्चियन सरनेझकीयांनी हंगेरीतील पिस्झकेस्टेटो माउंटन स्टेशन येथील कोन्कोली वेधशाळेतून हा लघुग्रह  प्रथम पाहिला. या लघुग्रहाचे नाव 2024BXI असे आहे. जर्मनीजव एक लघुग्रह धडकणार असल्याचा इशारा नासाने दिला होता.  बर्लिन शहरावर हा लघुग्रह धडकणार असल्याचेही नासाने सांगितले होते.

बर्लिन शरहावर धडकलेला लघुग्रह आकाराने खूपच लहान आहे. पृथ्वीवर धडकताना हा लघुग्रह वातावरणातच जळून जाईल. यातून कोणतेही नुकसान नाही असे नासाने सांगितले होते. त्या प्रमाणे या लघुग्रहाचा जर्मनीत स्फोट झाला मात्र, फार नुसकना झालेले नाही. 

संशोधक शोधत आहेत लघुग्रहाचे तुकडे

संशोधक बर्लिन शहरावर धडकलेल्या या लघुग्रहाचे तुकडे गोळा करत आहेत.  याआधीही क्रिश्चियन सरनेझकी यांनी असे अनेक लघुग्रह शोधून काढले आहेत. नासा किंवा इतर शास्त्रज्ञांनी याची दखल घेतली नाही.  2022 मध्ये त्यांनी EB5 नावाची उल्का देखील शोधली होती. पृथ्वीच्या वातावरणावर आदळण्याआधीच अवघ्या दोन तास आधीच याचा शोध लागला. 

2013 लघुग्रहाच्या धडकेत जखणी झाले होते 1600 लोक

पृथ्वीवर धडकणाऱ्या 99 टक्के उल्का धोकादायक नाहीत असे युरोपियन स्पेस एजन्सीने म्हटले आहे. मात्र, 2013 मध्ये, रशियातील शेलियाबिन्स्कमध्ये एक उल्का प्रचंड वेगाने धडकली होती. त्यामुळे संपूर्ण शहरातील इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. लोकांना काही सेकंदही दिसत नव्हते. 1600 लोक जखमी झाले होते.