एका रात्रीत 6740000000 अब्ज रुपयांचा नफा; जगातील श्रीमंतांच्या यादीत मस्क पहिला; अदानी- अंबानींचं स्थान कितवं?

Worlds Richest man list : जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींची यादी समोर आली असून, या यादीत कोणाची नावं समोर आली आहेत? अंबानी आणि अदानींना यादीत कोणतं स्थान? 

सायली पाटील | Updated: Jun 18, 2024, 02:51 PM IST
एका रात्रीत 6740000000 अब्ज रुपयांचा नफा; जगातील श्रीमंतांच्या यादीत मस्क पहिला; अदानी- अंबानींचं स्थान कितवं? title=
Elon Musk becomes Worlds Richest man adani and ambani ranks this

Worlds Richest man list : जगभरातील श्रीमंत व्यक्तींची यादी जेव्हाजेव्हा समोर येते तेव्हातेव्हा काही नावांचा त्यात हमखास समावेश असतो. यावेळेस समोर आलेली यादीसुद्धा इथं अपवाद ठरलेली नाही. हो, पण या यादीत उलटफेर झाला आहे हे मात्र नक्की. टेस्ला आणि स्पेस एक्स यांसारख्या कंपनीची मालकी असणाऱ्या एलॉन मस्क यानं जगभरातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पुन्हा एकदा अग्रस्थानी येत सर्वांनाच धक्का दिला आहे. (Amazon Jeff Bezos) अॅमेझॉनच्या जेफ बेजोस यांना मस्कनं मागे टाकलं आहे. 

मागील 24 तासांमध्ये मस्कच्या एकूण संपत्तीच्या आकड्यात प्रचंड वाढ झाली असून, एका क्षणात त्याच्या संपत्तीमध्ये 6740000000 रुपयांची वाढ झाली. ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सच्या माहितीनुसार या अब्जोंच्या नफ्यामुळं मस्कची एकूण संपत्ती 1,75,22,96,70,00,00 रुपये म्हणजेच 210 अब्ज डॉलर इतकी झाली आणि तो पुन्हा जगभरातील श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानी पोहोचला. 207 अब्ज डॉलर इतकी संपत्ती असणाऱ्या जेफ बेजोस यांना त्यानं मागे टाकलं. (Worlds Rickest Person)

अंबानी आणि अदानींना कितवं स्थान? 

जगभरातील श्रीमंतांच्या यादीत भारतातील काही नावांचाही समावेश असून, यामध्ये 113 अब्ज डॉलर इतक्या संपत्तीसह आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) 13 व्या स्थानावर आहेत. तर, गौतम अदानी यांना या यादीत 14 वं स्थान मिळालं आहे. मागील वर्षभरात 22.3 अब्ज डॉलरच्या नफ्यासह त्यांची एकूण संपत्ती 107 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. तर, गेल्या वर्षभरात अंबानींना झालेल्या नफ्याची आकडेवारी आबे 16.2 अब्ज डॉलर्स. 

जगभरातील श्रीमंतांच्या यादीत Top ला कोणाची नावं? 

ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार जगातील Top 10 श्रीमंतांच्या यादीत पहिल्या तीन धनाढ्य व्यक्तींची संपत्ती 200 अब्ज डॉलरहून जास्त आहे. यामध्ये पहिल्या स्थानी एलॉन मस्क, दुसऱ्या स्थानी जेफ बेजोस आणि तिसऱ्या स्थानावर बर्नार्ड आरनॉल्ट (200 अब्ज डॉलर) यांच्या नावाचा समावेश आहे. 

हेसुद्धा वाचा : लहान मुलांना कोणत्या वयापासून ट्रेकिंगला न्यावं? महाराष्ट्रातील 'हे' बेस्ट ट्रेक त्यांच्यासाठीच...

यादीत चौथ्या स्थानावर मार्क झुकरबर्गचं नाव असून, त्याची संपत्ती आहे 180 अब्ज डॉलर. तर, पाचव्या स्थानी 158 अब्ज डॉलरच्या संपत्तीचे मालक लॅरी पेज. मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स या यादीत सहाव्या स्थानी असून त्यांच्या संपत्तीचा आकडा आहे, 157 अब्ज डॉलर. यादीत सातवं स्थान आहे स्टीव बाल्मर यांचं आणि त्यांच्या संपत्तीचा आकडा आहे 154 अब्ज डॉलर. तर, आठव्या स्थानावर आहेत 153 अब्ज डॉलर इतक्या संपत्तीचे मालक लॅरी एलिसन. 148 अब्ज डॉलर इतक्या संपत्तीसह यादीत नववं स्थान मिळालं आहे सर्गेई ब्रिन यांना. तर, दहावं स्थआन आहे वॉरन बफे यांचं. त्यांची एकूण संपत्ती आहे 135 अब्ज डॉलर.