Apple iMessage : संसार म्हटला की भांड्याला भांडं लागणाराच. पती पत्नीमध्येही कधी प्रेम तर कधी वाद होतच असतात. पण काही वाद कितके टोकाला जातात की ते कोर्टात पोहोचतात. सात जन्माच नातं हे घटस्फोटापर्यंत पोहोचतं. असाच एक पती पत्नीमधील वाद घटस्फोटापर्यंत पोहोचला पण पतीने प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी असलेल्या ॲपलवर दावा ठोकला आहेत.
टाईम्सच्या रिपोर्टनुसार, ब्रिटनमधील एका व्यक्तीसोबत हा विचित्र घटना घडली आहे. या व्यक्तीने त्याचा घटस्फोटाला स्मार्टफोन निर्माता कंपनी असलेल्या ॲपल जबाबदार ठरवलं आहे. या व्यक्तीने ॲपलच्या सुरक्षा आणि गोपनीयता वैशिष्ट्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. तो म्हणतो की ॲपलमध्ये एक बग आहे. ज्यानुसार आपण iMessage मधील मेसेज किंवा व्हिडीओ, फोटो डिलीट केले ते परत दिसत नाहीत. पण ॲपल उत्पादनांमध्ये सिंक्रोनायझेशनमुळे सर्व डिलीट केलेले संदेश iMac वर आले होते. त्याने आरोप केला की ॲपलने त्याला माहिती दिली नाही की डिव्हाइसमधून संदेश हटवल्याने ते इतर सिंक केलेल्या डिव्हाइसेसमधून डिलीट होणार नाही. (Woman files for divorce after reading husband deleted chat on iMessage with prostitute Man sues Apple viral news )
त्याने सांगितले की, ॲपलच्या चुकीमुळे पत्नीने मेसेज पाहिले आणि तिने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. रिपोर्टनुसार, या व्यक्तीने Apple वर 52,99,94,500 कोटींचा दावा ठोकला आहे. ॲपलवर गुन्हा दाखल करताना तो म्हणाला की, एका डिव्हाइसवरील मेसेज डिलीट करणे पुरेसे नाही, हे त्यांनी सांगायला हवं होतं. आम्हाला सर्व उपकरणांमधून मेसेज डिलीट करावे लागतील हे त्यांनी सांगितलं नाही.
टाईम्सच्या रिपोर्टनुसार, त्या व्यक्तीन पत्नीच्या न कळत देहविक्री करणाऱ्या महिलेला मेसेज केले होते. ते सर्व मेसेज त्यांने iMessage मधून डिलीट केले होते. पण पत्नीने ते सर्व मेसेज सिंक केलेल्या डिव्हाइसेसमधून शोधून ते वाचले. त्यामुळे त्या दोघांमध्ये भांडण झाले. शिवाय हे प्रकरण घटस्फोटापर्यंत गेले आहे. त्या व्यक्तीने सांगितलं की, ॲपलमुळे त्याला या घटस्फोटामुळे मानसिक आणि आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे ॲपलच्या चुकीमुळे त्याला हे सगळं सहन करावं लागलं. म्हणून त्याने ॲपलविरोधात दावा ठोकला आहे.