Elon Musk पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, अंबानी- गौतम अदानींचा नंबर कितवा?

Elon Musk : पैसा आज आहे पण उद्या नाही असं म्हणतात. पैशाच्या बाबतीत या गोष्टी अनेकदा खऱ्या ठरतात. अशाचप्रकार गौतम अदानी यांच्याबाबती दिसून आला असून गौतम अदानी जगातील तिसऱ्या क्रमांकावरून आता पहिल्या 30 अब्जाधिशांच्या यादीतून बाहेर पडले. मात्र गेल्यावर्षी दुसऱ्या क्रमांकावर असलेले एलन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहे.

Updated: Feb 28, 2023, 04:44 PM IST
Elon Musk पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, अंबानी- गौतम अदानींचा नंबर कितवा? title=

Elon Musk : वर्ष 2022 मध्ये मोठ्या तोट्यामुळे ट्वविटर, टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक एलन मस्क (Elon Musk) जगातील अब्जाधीशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर घसरले होते. पैसा आज आहे पण उद्या नाही असं म्हणतात. पैशाच्या बाबतीत या गोष्टी अनेकदा खऱ्या ठरतात. अशाचप्रकार गौतम अदानी यांच्याबाबती दिसून आला असून गौतम अदानी जगातील तिसऱ्या क्रमांकावरून आता पहिल्या 30 अब्जाधिशांच्या यादीतून बाहेर पडले. मात्र गेल्यावर्षी दुसऱ्या क्रमांकावर असलेले एलन मस्क गेल्या दोन महिन्यात टेस्लाच्या शेअर्समध्ये 90 टक्क्यांनी झेप घेत एलन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहे. 

गेल्या वर्षी बर्नार्ड अरनॉलटने एलन मस्कला मागे टाकले होते. कारण एलन मस्क यांची संपत्ती 200 अब्ज डॉलरच्या खाली गेली होती. 2022 वर्ष मस्कसाठी खूप वाईट ठरले असून 44 अब्ज डॉलरच्या ट्विटर डीलच्या सुरूवातीपासून त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये जोरदार घसरण सुरू झाली होती. दरम्यान गेल्या वर्षी एलन मस्कने सार्वधिक संपत्ती गमावली, पण त्यानंतर या वर्षाच्या सुरूवातीपासून कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे त्यांच्या संपत्तीमध्ये वाढ झाली. 

वाचा: शुभमन की राहूल? कोणाला मिळणार संधी? जाणून घ्या इंदूर कसोटीची Playing XI 

एलन मस्क यांची संपत्ती किती?

ब्लूमबर्ग बिलियने इंडेक्सनुसार, एलन मस्क यांची एकूण संपत्ती 187 अब्ज डॉलर झाली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलेल्या बर्नार्ड अनॉलटची एकूण संपत्ती 185 अब्ज डॉलर आहे.  एकंदरीत एलन मस्क यांच्या संपत्तीत चालू वर्षात विक्रमी वाढ झाली आहे. जानेवारी 2023 पासून एलन मस्कने त्यांच्या संपत्तीत 50.1 अब्ज डॉलरची भर पडली असून सोमवारी एलन मस्कच्या संपत्तीत 6.98 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. 

मुकेश अंबानी आणि गौतम अदानी कितव्या क्रमांकावर? 

भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी टॉप-10 मध्ये आपले स्थान कायम ठेवले आहे. तर 81.1 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह, रिलायन्सचे चेअरमन जगातील 10 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. तर हिंडेनबर्गच्या भोवऱ्यात अडकलेले गौतम अदानी (Gautam Adani) 37.7 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील श्रीमंतांच्या यादीत 32 व्या क्रमांकावर पोहचले आहेत.