इंग्लंड : कोरोना लस अखेर बाजारात, पुढील आठवड्यात लस द्यायला सुरुवात

 गेले वर्षभर आपण सगळ्यांनीच ज्याची वाट पाहिली, ती कोरोनाची लस अखेर बाजारात आली आहे. इंग्लंडमध्ये पुढच्या आठवड्यात लस द्यायला सुरुवात होणार आहे.  

Updated: Dec 2, 2020, 06:43 PM IST
इंग्लंड : कोरोना लस अखेर बाजारात, पुढील आठवड्यात लस द्यायला सुरुवात

लंडन : गेले वर्षभर आपण सगळ्यांनीच ज्याची वाट पाहिली, ती कोरोनाची लस  (Covid vaccine) अखेर बाजारात आली आहे. इंग्लंडमध्ये पुढच्या आठवड्यात लस द्यायला सुरुवात होणार आहे. गेल्या वर्षभरात सर्वाधिक ज्याची वाट बघितली गेली, ती कोरोनाची लस प्रत्यक्षात नागरिकांना देणारा इंग्लंड हा पहिला देश ठरणार आहे. इंग्लंडमध्ये पुढच्या आठवड्यात कोरोनाची लस उपलब्ध होणार आहे. ब्रिटन सरकारने फायझर बायोटेकच्या लसला (Pfizer/BioNTech Covid vaccine ) परवानगी दिली आहे. संपूर्ण इंग्लंडभर पुढच्या आठवड्यात फायझरची लस टोचायला सुरुवात होणार आहे. 

विज्ञानाचाच विजय होईल, हा आमचा दावा होता. इंग्लंडनं लसबाबत दिलेली परवानगी म्हणजे आमच्या प्रयत्नांवर शिक्कामोर्तब आहे. जगभरात लसबाबत वेगाने वितरणासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे फायझरचे सीईओ अल्बर्ट बोरुला यांनी स्पष्ट केले आहे. कोविडविरोधात लस परवाना देणारा यूके हा पहिला पाश्चित्य देश ठरला आहे. कोरोनाचा जास्त धोका असल्याने लोकांना पुढील आठवड्यात फायझर / बायोटेक लस टोचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अमेरिका आणि युरोपच्या निर्णयापूर्वी मेडिसीन्स अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी अथॉरिटीने (एमएचआरए) आणीबाणीच्या वापरासाठी लस अधिकृत केली आहे.  येत्या काही दिवसांत लसची पहिली डोस येईल, असे कंपनीने म्हटले आहे. यूकेने लसीचे ४० मिलियन डोस विकत घेतले आहेत, ज्याच्या अंतिम चाचण्यांमध्ये ९५ % यशस्वी ठरली गेली आहे.

भारतामध्येही ऑक्सफर्ड अॅस्ट्राझेन्का कंपनीची लस प्रगतीपथावर आहे. आणि लवकरच भारतातल्या नागरिकांनाही लस दिली जाणार आहे. २०२० हे पूर्ण वर्षं कोरोनाने खाऊन टाकले. पण २०२१ हे माणसाने कोरोनावर मिळवलेल्या विजयाचंच असणार आहे. डर के आगे जीत है, अशीच प्रचिती येणार आहे.