Interesting: 'हा' कोणता देश आहे जिथे एका वर्षांत 12 नाही 13 महिने असतात...

Ethiopia: आपल्या जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला माहितीही नसते परंतु त्या गोष्टी जाणून घेतल्यावर आपल्यालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. सध्या अशाच काही गोष्टी आपल्यासमोर येताना दिसत आहेत.

Updated: Jan 29, 2023, 07:32 PM IST
Interesting: 'हा' कोणता देश आहे जिथे एका वर्षांत 12 नाही 13 महिने असतात...  title=

Ethiopia: आपल्या जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला माहितीही नसते परंतु त्या गोष्टी जाणून घेतल्यावर आपल्यालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. सध्या अशाच काही गोष्टी आपल्यासमोर येताना दिसत आहेत. त्यातीलच एक इंटरेस्टिंग गोष्ट (Interesting Fact) सध्या सगळीकडेच व्हायरल होते आहे. ही गोष्ट कदाचित तुम्हालाही माहिती नसेल. आपल्या जगात असाच एक देश आहे जो 2023 मध्ये नसून 2015 मध्ये जगतो आहे. हो, या देशात एका वर्षात 12 महिने नाहीत तर 13 महिने आहेत. (Ethiopia which has 13 months in a year know more about this interesting fact)

त्यामुळे या देशाच्या कलेंडरनुसार येथे एका वर्षात 13 महिने आहेत त्यामुळे हा देशात जगाच्या मागे आहे. चला तर मग जाणून घेऊया की या देशामध्ये नक्की कुठले कलेंडर फॉलो केले जाते आणि नक्की येथे अशी परंपरा केव्हा पासून आली. हा देश फक्त काळाने मागे आहे परंतु याचा अर्थ हा काही असा नाही की हा देश काही तंत्रज्ञानाच्या मागे आहे. हा देश तंत्रज्ञानाच्या बाबतीत खूप पुढे आहे. या देशात एक कलेंडर फॉलो केले जाते. त्यामुळे हा देश आपल्या सगळ्यांच्याच मागे राहतो. येथे असे कोणते कलेंडर फॉलो केले जाते असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल.

या देशाचे नावं आहे इथोयोपिया. या देशाच्या काळात आणि आपल्या काळात फार मोठा फरक आहे. हा देश शतकानुशतके फक्त हेच कलेंडर फॉलो करतं. त्यामुळे आपल्याला त्यांच्या देशात जाण्यासाठीही आपल्याला त्यांच्याप्रमाणे डेट फॉलो करावी लागते. 

मागे असण्याचं काय आहे नक्की कारणं? 

इथिओपिया 7 वर्षे मागे राहण्यासाठी त्यांच कॅलेंडर जबाबदार आहे. येथील कॅलेंडर संपूर्ण जगाच्या कॅलेंडरपेक्षा वेगळे आहे. इथिओपियातील लोक ज्युलियस सीझरने बनवलेले कॅलेंडर वापरतात. म्हणूनच या देशात 12 ऐवजी 13 महिन्यांचे 1 वर्ष आहे आणि हा देश जगाच्या तुलनेत 7 वर्षे मागे आहे.  जेव्हा संपूर्ण जगाने ग्रेगोरियन कॅलेंडर बनवले आणि त्याचा आधार म्हणून स्वीकार केला, तेव्हा इथिओपियाने हे कॅलेंडर स्वीकारण्यास नकार दिला आणि ज्युलियस सीझरने तयार केलेल्या ज्युलियन कॅलेंडरचे अनुसरण करण्यास सुरुवात केली. 

13 व्या पोप ग्रेगरी यांनी 1582 मध्ये याची सुरुवात केली होती. ज्युलियन कॅलेंडरमध्ये सुधारणा करून त्यांनी हे कॅलेंडर बनवले आणि 1 जानेवारी हा नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून घोषित केला. हे कॅलेंडर जगभर लागू आहे, परंतु एकट्या इथिओपियाने ते स्वीकारण्यास नकार दिला आणि जुन्या ज्युलियन कॅलेंडरचे पालन करण्यावर ठाम राहिले.