Trump : मार्क झुकरबर्गच्या मौनावर प्रश्न विचारणं इंजिनिअरला पडलं महागात

तरूणाला गमवावी लागली नोकरी 

Updated: Jun 13, 2020, 10:25 AM IST
Trump : मार्क झुकरबर्गच्या मौनावर प्रश्न विचारणं इंजिनिअरला पडलं महागात  title=

मुंबई : अमेरिकीचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी फेसबुकवर शेअर केलेल्या भडकाऊ आणि उत्तेजक पोस्टवर कारवाई करण्यात आली नाही. या मुद्यावर फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग याच्यावर टीका करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला फेसबुकमधून काढण्यात आलं आहे. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार युझर इंटरफेस इंजीनिअर ब्रँडन डेलने असा दावा केला आहे की, या कर्मचाऱ्यावर झुकरबर्गवर आरोप केल्यामुळे त्याला काढण्यात आलं आहे. 

ब्रँडन डेल (Brandon Dail) च्या सोशल मीडिया प्रोफाईलवरून तो सिएटलमध्ये युझर इंटरफेस इंजिनिअर म्हणून फेसबुकशी जोडला गेलेला आहे. त्याने या संबंधित अनेक ट्विट केले आहेत. मी ज्या मुद्यावर ट्विट केलं आहे त्यावर मी ठाम आहे. 

फक्त डेलच नाही त्याच्या टीममधील इतर कर्मचाऱ्यांनी देखील मार्क झुकरबर्गच्या मौनावर नाराजी व्यक्त केली आहे.

यानंतर मार्क झुकरबर्ग यांनी आपल्या कर्मचाऱ्यांशी वर्चुअली संवाद साधण्याचा निर्णय घेतला. डेल यांच म्हणण आहे की, त्याला चुकीच्या गोष्टीविरोधात आवाज उठवल्यामुळे नोकरीवरून काढण्यात आले. पण त्यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलंय की, मार्क झुकरबर्ग यांच मौन देखील एक राजकारणच आहे.

डेलने अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प यांच्या पोस्टला विरोध केला आहे. जॉर्ज फ्लॉयडच्या हत्येनंतर अमेरिकेत जी परिस्थिती निर्माण झाली त्यावर डेलने प्रतिक्रिया दिली होती.