जुलै 2021 पर्यंत फेसबुकच्या कर्मचार्‍यांना घरून काम करण्याची परवानगी

कोरोनाने जगभरात थैमान घातलं असताना फेसबुकने मोठं पाऊल उचललं आहे.

Updated: Aug 7, 2020, 02:27 PM IST
जुलै 2021 पर्यंत फेसबुकच्या कर्मचार्‍यांना घरून काम करण्याची परवानगी

मुंबई : कोरोनामुळे जगभरातील जनजीवन विस्कळीत झालं. बहुतेक लोकं आपल्या घरातून ऑफिसची कामे करत आहेत. वर्क फ्रॉम होममुळे कर्मचाऱ्यांचा आरोग्य सुरक्षित आहेत. त्यातच आता जुलै 2021 पर्यंत फेसबुकने आपल्या सर्व कर्मचार्‍यांना घरून काम करण्याची परवानगी दिली आहे. इतकेच नाही तर फेसबुक त्यांच्या कर्मचाऱ्यांना 1000 डॉलर पर्यंतची मदत देखील करणार आहे.

याआधी गुगल, ट्विटरने देखील त्यांच्या कर्मचार्‍यांना घरून काम करण्याची परवानगी दिली आहे.

फेसबुकच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे की, "सरकारने जारी केलेले आरोग्य मार्गदर्शक तत्वे आणि कंपनीमधील परस्पर करारानंतर आम्ही आमच्या सर्व कर्मचार्‍यांना घरून काम करण्याची परवानगी दिली आहे. जुलै 2021 पर्यंत ही सवलत देण्यात आली आहे.'

ज्या ठिकाणी कार्यालये उघडण्यास सूट असेल तेथे नियमानुसार कार्यालये उघडली जातील. परंतु या वर्षापर्यंत अमेरिका, लॅटिन अमेरिकेत देशांमध्ये कार्यालये उघडण्याची शक्यता नाही.

हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की केवळ जगातील विविध देशांमध्येच नव्हे तर भारतातही वर्क फ्रॉम होमची संस्कृती सुरु झाली आहे. कोरोना संकटामुळे बहुतेक खासगी कंपन्यांचे कर्मचारी घरातूनच काम करत आहेत. तसेच सरकारी कार्यालयांच्या अधिकाऱ्यांनाही काही प्रमाणात घरुन काम करण्याची मुभा देण्यात आली आहे.