जगातलं असं अनोखं गाव जिथं राहातोय एकटाच माणूस, काय यामागचं नेमकं कारण

जगातल्या अनोख्या गावात राहातोय एकटाच माणूस, विचार करा कसा राहातोय एकटाच...

Updated: Dec 20, 2021, 09:16 PM IST
जगातलं असं अनोखं गाव जिथं राहातोय एकटाच माणूस, काय यामागचं नेमकं कारण title=

डोबरुसा : एका खोलीत किंवा घरात आपण ठरावीक काळ एकटं राहिलो की आपल्याला घर खायला उठल्यासारखं होतं. अस्वस्थता जाणवते किंवा वेगळंच काहीतरी होतं. आपल्याला एक वेळे पलिकडे एकटेपणा खायला उठतो. मात्र एक असं गाव आहे जिथे एक माणूस अख्ख्या गावात एकटाच राहात आहे. यामागचं रहस्य आज जाणून घेणार आहोत.

शहरातील धकाधकीचं वातावरण, तणाव आणि गोंगाटापासून दूर अनेक किमी दूर अशा ठिकाणी हा व्यक्ती एकटा राहात आहे. अख्ख्या गावात एकटा व्यक्ती राहात असल्याचं ऐकल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटू शकतं. मात्र हे सत्य आहे. गावातील काही लोक शहरात गेले. तर काही जणांनी गाव सोडलं. 

गावातील काही लोकांचं निधन झालं. तर काही लोक अजूबाजूच्या गावांमध्ये स्थलांतरीत झाले. रशियाच्या सीमेवर डोबरुसा नावाचं हे गाव आहे. जिथे एकटा व्यक्ती या गावात उरला आहे. वर्षाच्या सुरुवातीला गावात 3 लोक उरले होते. त्यामध्ये एका दाम्पत्याची हत्या झाली. त्यानंतर गावात एकच व्यक्ती उरला आहे. गरीसा मुनटेन असं या व्यक्तीचं नाव आहे.

स्थानिक मीडियाच्या म्हणण्यानुसार या गावात 3 दशकापूर्वी 200 लोक राहात होते. मात्र आज परिस्थिती अशी आहे की एकच व्यक्ती गावात उरला आहे. आता हा व्यक्ती आपला वेळ कसा घालवतो असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? 

या व्यक्तीनं 5 कुत्रे, 9 टर्की पक्षी, 2 मांजरी, 42 कोंबड्या, 120 बदकं, 50 कबुतरं आणि हजारो मधमाशा पाळल्या आहेत. या सगळ्यांसोबत गरीसा आपला वेळ घालवतात. या गावात 50 घरं होती. सोविएत संघ तुटल्यानंतर मालडोवा, रशिया, युरोप या भागांमध्ये इथली कुटुंब स्थलांतरीत झाले असं गरीस म्हणाला. 

एकटं राहण्यामुऴे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक समस्या येतात बोलायचं कुणाशी हा प्रश्न पडतो. अशावेळी मी प्राणी-पक्ष्यांसोबत बोलतो असंही गरीस म्हणाले. एकटेपणा दूर करण्यासाठी त्यांनी प्राणी-पक्षांसोबत वेळ घालवणं पसंत केलं आहे.