Fact Check : समुद्र किनाऱ्यावरील मस्ती जीवावर बेतली

तुम्ही जर पावसात बीचवर जात असाल तर ही बातमी पाहा आणि सावध व्हा. कारण, समुद्र किनाऱ्यावर मस्ती करणं पर्यटकांच्या जीवावर बेतलंय.

Updated: Jul 12, 2022, 10:58 PM IST
Fact Check : समुद्र किनाऱ्यावरील मस्ती जीवावर बेतली title=

मुंबई : बातमी आहे एका व्हायरल व्हीडिओची. तुम्ही जर पावसात बीचवर जात असाल तर ही बातमी पाहा आणि सावध व्हा. कारण, समुद्र किनाऱ्यावर मस्ती करणं पर्यटकांच्या जीवावर बेतलंय. नेमकं असं काय घडलं?  जाणून घेऊयात.  (fact check viral polkhol sea high tide risk)

समुद्र किनारी पर्यटकांची मस्ती सुरू होती. उंच लाटांचा आनंद पर्यटक घेत होते. पण, या पर्यटकांचा अतिउत्साह जीवावर बेतलाय. उंच उंच लाटा उसळत असताना पर्यटक समुद्र किनाऱ्यावर मस्ती करत होते. त्यावेळी एक भलीमोठी लाट उसळली. आता पुन्हा एकदा पाहा केवढी मोठी ही लाट उसळलीय. 

या लाटेत किनाऱ्यावरील पर्यटकांना जोरात फटका बसला. 10 ते 12 जण वाहून गेले. पण, इतरांनी दगडांचा आधार घेत कसंबसं स्वस्त:ला सावरलं. मात्र, दोन मुली परतणाऱ्या लाटांच्या प्रवाहात समुद्रात वाहून गेल्या. 

त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण, पाण्याचा वेगच एवढा होता की दोन्ही मुली हातीच लागल्या नाही आणि 20 सेकंदापूर्वी बीचवर मौज मज्जा करणाऱ्या या तरुणी सर्वांच्या डोळ्यांसमोर पाण्यात वाहून गेल्या. लाटांशी मस्ती करणं या मुलींच्या जीवावर बेतलंय.

व्हायरल पोलखोल

व्हायरल व्हिडिओ परदेशातील असल्याची माहिती आहे. समुद्रातील उंच लाटेत 2 मुली वाहून गेल्या. उंच लाटा उसळत असतानाची मस्ती महागात पडली. 

समुद्राला उधाण आलेलं असताना किनाऱ्यावर जाऊ नका असं सांगितलं जातं. तरीदेखील काही लोक जीवघेणं धाडस करतात. असंच धाडस या पर्यटकांच्या जीवावर बेतलंय. त्यामुळे तुम्ही कधीही समुद्रकिना-यावर लाटांशी मस्ती करू नका.