बागेत हरवलेलं कानातलं शोधताना कुटुंबाला सापडल्या 1000 वर्ष जुन्या वस्तू; महिलांशी खास कनेक्शन

Family found treasure: आपल्या कधी कोणत्या गोष्टीचा शोध लागेल याचा काहीच नेम नाही. त्यातून आपल्याला अशावेळी काही संशोधक असायचीही गरज नसते. हातात काहीच नसताना साधारण दिवशीही आपल्याला काय मिळेल याचाही नेम नाही. सध्या अशाच एका परिवाराच्या हाती एक खजिना सापडला आहे. 

Updated: Oct 8, 2023, 06:36 PM IST
बागेत हरवलेलं कानातलं शोधताना कुटुंबाला सापडल्या 1000 वर्ष जुन्या वस्तू; महिलांशी खास कनेक्शन title=
family got treasure while seaching for earing in norway viral news in marathi

Family found treasure: आपल्या कधी कोणती गोष्ट सापडेल याचा काहीच नेम नाही त्यातून आपल्या या पृथ्वीवर अशी अनेक रहस्य आहेत जी जाणून घेण्यासाठी आपल्यालाही फार जास्त उत्सुकता असते. असं अनेकदा घडताना आपण पाहिलं आहे की आपण एकच गोष्ट शोधायला जातो आणि मग आपल्याला काहीतरी वेगळंच सापडतं. परंतु आता आम्ही तुम्हाला अशाच एका घटनेविषयी सांगणार आहोत. ही घटना अशीच काहीशी आहे. एक गोष्ट शोधायला गेलेल्या परिवाराला मोठा खजिना सापडला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर याचीच चर्चा आहे. आपण अनेकदा चित्रपटांतून पाहतच असतो की एका नशीबवानाला भलामोठा खजिना मिळतो आणि त्याची चांदीच होते. त्यातून आपल्या पृथ्वीवरही असा फार मोठा खजिना असल्याची आपण कायमच चर्चा ऐकत असतो. त्यातून आता तर अंतराळातही ग्रहावर सोनं आहे याचीही चर्चा पाहायला मिळते. 

अशातच आता चर्चा आहे ती म्हणजे परदेशातील एका परिवाराची. ही गोष्ट आहे. ही म्हणजे अशाच एका कुटुंबाची ज्यांना शोधायचं होतं काहीतरी वेगळं आणि त्यांच्या हाती काहीतरी वेगळंच लागलं आहे. 

नोर्वेतील एका परिवाराची ही गोष्ट आहे. त्यांना अशी गोष्ट सापडली आहे ज्याची जोरात चर्चा रंगलेली आहे. तुम्हाला माहितीये हा परिवार आपल्या घराच्या बागेत हरवलेलं कानातलं शोधत होते. तेवढ्यातच त्यांना अशी एक गोष्ट मिळाली आहे जी पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट तब्बल 1000 वर्षे जूनी असल्याची माहिती यातून कळते आहे. बीबीसीच्या  वृत्तानुसार, नोर्वेतील एका परिवाराला जमिनीतून दफन केलेल्या काही किमती गोष्टी सापडल्या आहेत. तज्ञांच्या मते, जोमफ्रूलॅंडच्या एका छोट्याश्या द्वीपवर एका महिलेला दफन करताना या मिळालेल्या गोष्टींचा वापर करण्यात आला होता. या सर्व गोष्टी एका मोठ्या झाडाखाली सापडल्या आहेत. 

9 व्या दशकातील पुरावे सापडले?

वेस्टफोल्ड आणि टेलिमार्क काऊंटी काऊंसिलच्या सांस्कृतिक विभागानं फेसबुक दोन आठवड्यांपुर्वी एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे की, आम्ही या परिवाराला शुभेच्छा देतो. वायकिंग युगमधील काही मौल्यवान गोष्टींचा शोध त्यांनी फार सुरक्षितपणे लावला आहे. 

सापडलेल्या गोष्टींमध्ये काय? 

या पोस्टमधून काही फोटोही शेअर करण्यात आले आहेत. ज्यात या कब्रस्तानमधून अंडाकृतीच्या आकाराचा ब्रुच सापडला आहे. हॉल्टर ड्रेसमधील महिलेचे खांदे आणि काही कपड्यांचे अवशेष आहेत.