मास्को : प्रत्येक बापासाठी त्याची मुलगी जगातील सुंदर परी असते. आपल्या मुलीला बाप स्वप्नात देखील दुःखी पाहू शकत नाही. मात्र जेव्हा आपल्या जवळचीच व्यक्ती आपल्या लेकीच्या दुःखाचं कारण असते तेव्हा त्या बापाच्या तळपायाची आग मस्तकात जाते. तेव्हा तो बाप लेकीसाठी सर्व सीमा पार करतो. असंच काहीस रशियामध्ये घडलं आहे. बापाने आपल्या मुलीच्या सुरक्षेसाठी बापाने टोकाचं पाऊल उचललं आहे.
वडिलांनी आपल्या 8 वर्षांच्या मुलीवर रेप करणाऱ्या मित्रावर चाकूचे सपासप वार केलेत. या हल्ल्यात मित्राचा मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण परिसर हादरालच आहे. मित्रानेच केला मित्राचा घात.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, रशियाच्या रॉकेट इंजन फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या 34 वर्षीय व्याचेस्लाव गाव आपल्या 32 वर्षीय मित्राच्या ओलेग स्विरिडोव (Oleg Sviridov)सोबत दारू पित होते. तेव्हा व्याचेस्लावने अचानक ओलेगाचा मोबाइल घेतला आणि चाळू लागला. याच दरम्यान व्याचेस्लावला मोबाइलमध्ये एक व्हिडीओ सापडला. जेव्हा त्याने तो व्हिडीओ प्ले केला तेव्हा त्याच्या पायाखालची जमिनच सरकली. तो व्हिडीओ त्याच्याच मुलीचा होता. जिच्यावर ओलेगने बलात्कार केला होता.
आपल्या मुलीसोबत बलात्काराचा व्हिडिओ पाहून वडील चिडले आणि ओलेगशी वाद घालू लागले. नशेच्या अवस्थेत असले तरी, व्याचेस्लाव काहीही करण्यापूर्वी, ओलेग पळून गेला. यानंतर व्याचेस्लावने पोलिसांना संपूर्ण प्रकरण सांगितले आणि ओलेगविरुद्ध त्याच्या मुलीवर बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली. पण व्याचेस्लाव त्याच्या मित्राची ही फसवणूक विसरू शकला नाही. त्यामुळे पोलिसांबरोबरच त्याने ओलेगला शोधून त्याला शिक्षा करण्याचे ठरवले आणि त्याच्या शोधासाठी निघाले.
अहवालानुसार, एक दिवस व्याचेस्लाव ओलेगला भेटला आणि व्याचेस्लावने ओलेगला चाकूने भोसकून ठार मारले. काही वेळानंतर पोलिसांनी जवळच्या जंगलातून ओलेगचा मृतदेह बाहेर काढला. यानंतर, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला आणि पुराव्यांच्या आधारे व्याचेस्लावला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे ओलेगच्या मोबाईलवर आणखी बऱ्याच मुलांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ होते, ज्यातून तो पूर्वीही बलात्कार करून मुक्तपणे फिरत होता. म्हणूनच आज रशियातील प्रत्येक लहान -मोठी व्यक्ती त्या वडिलांच्या बाजूने उभी आहे.
लोकांचे म्हणणे आहे की, हत्येचा खटला त्या व्यक्तीविरुद्ध चालवू नये कारण त्याने आपल्या मुलीचे तसेच समाजातील इतर मुलांचे संरक्षण केले आहे. त्याच वेळी, दुसऱ्या व्यक्तीने सांगितले की व्याचेस्लाव किलर नाही. त्याने आपल्या मुलीचे आणि आमच्या मुलांचेही संरक्षण केले आहे. त्याच्यावर खुनाचा गुन्हा असू नये. व्याचेस्लावच्या समर्थनार्थ अनेक रशियन पत्रकारही बाहेर आले आहेत आणि त्यांना शिक्षा न देण्याची मागणीही केली जात आहे.