डोनाल्ड ट्रम्प यांचा असा झाला पोपट, व्हिडीओ व्हायरल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने काहीना काही कारणाने चर्चेत असतात. आता तर त्यांच्या चेहऱ्यावरील रंग उडाल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 7, 2017, 02:49 PM IST
डोनाल्ड ट्रम्प यांचा असा झाला पोपट, व्हिडीओ व्हायरल title=

वॉर्सा : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने काहीना काही कारणाने चर्चेत असतात. आता तर त्यांच्या चेहऱ्यावरील रंग उडाल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

डोनाल्ड ट्रम्प हे पोलंडच्या दौऱ्यावर आहे. पोलंडच्या फर्स्ट लेडींनी त्यांचा असा काही पचका केला की, तो ट्रम्प कधीच विसणार नाहीत.

पोलंडच्या फर्स्ट लेडी अँगाटा यांच्याशी ट्रम्प यांनी हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केला. मात्र, अॅंगाटा यांनी त्याकडे सरळ दुर्लक्ष करत त्यांनी ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया यांच्याकडे हस्तांदोलन करण्याकरिता पुढे सरसावल्या आणि ट्रम्प यांचा चेहऱ्याचा पार रंगच उडाला. आता हा प्रकार कॅमेरात कैद झालाय.