नवी दिल्ली : उत्तर मॅक्सिकोमध्ये मुसळधार पावसामुळे एका विमानाला अपघात झालाय. या विमान दुर्घटनेत १०० हून अधिक लोक जखमी झालेत. परंतु, सुदैवानं या दुर्घटनेत जीवितहानी टळलीय.
एएम २४३१ हे विमान दुर्घटनेत जमिनीवर कोसळलंय. अपघाताचं वृत्त समजताच सुरक्षादल घटनास्थळावर दाखल झालं आणि विमानातून जखमींना बाहेर काम काढण्याचं काम तातडीनं सुरू झालं.
या अपघातात विमानाची वरची बाजू संपूर्णत: नष्ट झाली... त्यामुळे हा अपघात किती गंभीर होता हे लक्षात येऊ शकेल.
विमानात ९७ प्रवासी तसंच चार चालक दलाचे सदस्य उपस्थित होते. जोरदार पावसातच विमानानं उड्डाणाचा प्रयत्न केला... परंतु, दुरंगो विमानतळापासून १० किलोमीटर अंतरावर हे विमान आपत्कालीन परिस्थितीत एका मैदानात उतरावं लागलं.