फ्लाइटमध्ये सौंदर्यवती आणि पायलटनं लावली 'आग'... सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये, विदेशी महिला आणि पायलट यांनी आग लावली आहे.

Updated: May 13, 2022, 06:39 PM IST
फ्लाइटमध्ये सौंदर्यवती आणि पायलटनं लावली 'आग'... सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल title=

मुंबई : नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये, विदेशी महिला आणि पायलट यांनी आग लावली आहे. ही खरीखुरी आग नाही तर, आपल्या डान्सनं आग लावली आहे. बॉलीवूड गाण्यांची क्रेझ देशाबरोबरच परदेशातही अनेकांना स्पष्ट दिसत आहे. तसेच परदेशात असे अनेक लोक आहेत, जे बॉलिवूडच्या अभिनेता किंवा अभिनेत्रीचे फॅन्स देखील आहेत. परदेशातील लोकांनाही शाहरुख खानची गाणी खूप आवडतात. 

फ्लाइटमध्ये किंग खान म्हणजेच शाहरुख खानच्या गाण्यावर नाचताना दिसत आहे. तिचा डान्स पाहून एअर होस्टेस आणि फ्लाइटचा पायलट देखील बाहेर होऊन डान्स करत आहेत.

बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानची फॅन फॉलोइंग इतकी आहे की, देशासोबतच विदेशातील लोकही त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करतात.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये ती विदेशी महिला 'ओम शांती ओम' या गाण्यावर नाचत आहे. एवढंच काय तर फ्लाईटमधील इतर प्रवासी आणि फ्लाईटचा पायलट देखील या गाण्यावर नाचताना डोलताना दिसत आहे. ज्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

खरंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यावर कमेंट करताना युजर्सने लिहिले की, या महिलेनं आणि पायलटनं तर आपल्या डान्सनं आगच लावली. त्यांच्या या डान्सने लोकांच्या मनात घर केलं आहे.