नेदरलॅंड : महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त देशा परदेशात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
भारताप्रमाणे नेदरलॅंडमधील हेग येथे 'आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन' साजरा केला. 'फॉलो द महात्मा' आणि 'गांधी मार्च' या दोन अभियानांचाही यामध्ये समावेश करण्यात आला होता.
हेग मधील कार्यक्रमात अभिनेता मिलिंद सोमण, भारताचे राजदूत वेणू राजामोनी सह अन्य अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला होता.
Gandhi March ends with the audience singing the famous civil rights song 'We shall overcome' #FollowtheMahatma @venurajamony pic.twitter.com/0CjaVPoAGx
— IndiainNetherlands (@IndinNederlands) October 1, 2017
'फॉलो द महात्मा' या कार्यक्रमामध्ये सुमारे ८०० लोकांनी सहभाग घेतला होता. भारतीय वेशभूषेमध्ये अनेकांनी यामध्ये सहभाग घेतला होता. तसेच ढोल ताशांच्या जल्लोषात गांधी जयंती साजरी करण्यात आली.
'Gandhi-an illustrated biography' या पुस्तकाचेदेखील यावेळेस अनावरण करण्यात आले. अहिंसेला पाठिंबा देणारे बॅनर्स यावेळी झळकवले. तसेच या कार्यक्रमाची सांगता एका संगीत कार्यक्रमाने झाली.