Rafale लढाऊ विमान बनवणाऱ्या कंपनी मालकाचा हेलिकॉप्टर अपघतात मृत्यू

राफेल (Rafale) लढाऊ विमान बनविणाऱ्या कंपनीचे मालक ऑलिवियर दसॉल्ट (Olivier Dassault) यांचे एका हेलिकॉप्टर दुर्घटनेत (helicopter crash) निधन झाले. 

Updated: Mar 9, 2021, 08:13 AM IST
Rafale लढाऊ विमान बनवणाऱ्या कंपनी मालकाचा हेलिकॉप्टर अपघतात मृत्यू  title=
Pic Courtesy: ANI

फ्रान्स : राफेल (Rafale) लढाऊ विमान बनविणाऱ्या कंपनीचे मालक ऑलिवियर दसॉल्ट (Olivier Dassault) यांचे एका हेलिकॉप्टर दुर्घटनेत (helicopter crash) निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते. दसॉल्ट यांच्या खासगी हेलिकॉप्टरला नॉर्मंडी येथे अपघात झाला. ऑलिवियर हे फ्रान्समधील अब्जाधीश उद्योजक आणि राजकारणी म्हणून ओळखले जातात. ऑलिवियर डसॉल्ट यांची कंपनी अनेक कारणाने चर्चेत होती. त्यापैकी एक म्हणजे भारताने राफेल लढाऊ विमान खरेदी करण्याचा करार. दरम्यान, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ऑलिवियर दसॉल्ट यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. (French billionaire politician Olivier Dassault killed in helicopter crash)

दसॉल्ट हे फ्रान्सच्या संसदेचे सदस्यदेखील होते. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी दसॉल्ट यांना श्रद्धांजली वाहताना म्हणाले, फ्रान्सची सतत सेवा करणारे व्यक्तीमत्व हरवल्याची भावना व्यक्त केली. त्यांच्या अचानक निधनामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्याच्या कुटुंबीयांबद्दल आणि प्रियजनांबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात स्थानिक वेळेनुसार रविवारी संध्याकाळी सहा वाजता आणि भारतीय वेळेनुसार रात्री साडेदहाच्या सुमारास झाला. याचे वृत्त रॉयटर या वृत्तसंस्थेने दिले आहे. दरम्यान, ऑलिवियर दसॉल्ट सुट्टी साजरी करण्यासाठी ते रविवारी बाहेर पडले होते. त्याचवेळी त्यांच्या हेलिकॉप्टरला नॉर्मंडी येथे हा अपघात झाला. 

ऑलिवियर दसॉल्ट हे फ्रान्समधील उद्योगपती सर्ज दसॉल्ट यांचे मोठे पुत्र होते. तर दसॉल्टचे संस्थापक मार्केल दसॉल्ट यांचे ते नातू होते. ओलिवियर यांची कंपनी जगप्रसिद्ध राफेल लढाऊ विमाने तयार करते. भारताने राफेलची लढाऊ विमाने खरेदी केली आहेत. दरम्यान, 2020 मध्ये फोर्ब्सच्या सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत दसॉल्ट यांनी 361 वे स्थान मिळवले होते. त्यात त्यांच्या दोन भावांसह बहिणींचा सुद्धा समावेश होता.