फ्रान्समध्ये सुपर मार्केटमध्ये दहशतवादी हल्ला, दोन ठार

दक्षिण पश्चिम फ्रान्समधील ट्रीबीस येथील सुपर मार्केटमध्ये दहशतवादी हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात दोन ठार झाल्याचे वृत्त एएनआयने दिलेय.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 23, 2018, 06:07 PM IST
फ्रान्समध्ये सुपर मार्केटमध्ये दहशतवादी हल्ला, दोन ठार title=

फ्रान्स : दक्षिण पश्चिम फ्रान्समधील ट्रीबीस येथील सुपर मार्केटमध्ये दहशतवादी हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात दोन ठार झाल्याचे वृत्त एएनआयने दिलेय. हा हल्ला इसिसने घडवून आणल्याचे वृत्त आहे. हल्ल्यानंतर कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आला असून सर्वत परिसात नाकाबंदी करण्यात आलेय.

हल्ला इसिसशी संबंधित 

दरम्यान, हल्ल्यानंतर काही जणांना बंधक करण्यात आल्याचे वृत्त हाती आले आहे. या हल्ल्यात दोन जण ठार झाल्याची माहिती आहे. इसिसशी संबंधित असल्याचा दावा करणाऱ्या हल्लेखोराने आठ जणांना बंधन बनवून ठेवल्याचे वृत्त आहे. नागरिकांना ओलीस ठेवणाऱ्या हल्लेखोराने पोलिसांवर गोळीबारही केला. 

 पोलिसावर गोळीबार 

हल्ल्याच्या ठिकाणी तात्काळ दहशतवादविरोधी पथक पोहोचले असून ते परिस्थिती हाताळत आहे, असे फ्रान्स सरकारकडून सांगण्यात आलेय. फ्रान्समध्ये एकाचवेळी हिंसाचाराच्या दोन वेगवेगळया घटना घडल्या आहेत. ट्रीबीस येथील सुपरमार्केटमध्ये हल्लेखोर घुसलेला असताना तिथूनच १५ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या कारकाससोन्नी येथे एका पोलिसावर गोळीबार करण्यात आल्याची दुसरी घटना घडलेय.

या हल्ल्यानंतर फ्रान्स सरकारने अर्लट जारी केलाय. लोकांमध्ये भितीचे वातावरण आहे. या दोन्ही घटनांचा परस्परांशी काही संबंध आहे का, याची चाचपणी पोलीस करत आहेत. मात्र, पोलिसांनी अजून तसे स्पष्ट केलेले नाही. फ्रान्सच्या पंतप्रधानांनी परिस्थिती गंभीर असल्याचे म्हटले असून अंतर्गत मंत्री गेरार्ड कोलाँब हे तात्काळ ट्रिबीसला रवाना झालेत.