Video : दोन विद्यार्थींमधील भांडण सोडवणं शिक्षिकेला पडलं महागात, गाठावं लागलं हॉस्पिटल...

Viral Video : वर्गात दोन विद्यार्थींमधील भांडण सोडवणं एका शिक्षिकेला महागात पडलं आहे. त्या शिक्षिकेचा डोक्याला लागल्यामुळे हॉस्पिटल गाठावं लागलं आहे. 

Updated: Oct 2, 2023, 05:50 PM IST
Video : दोन विद्यार्थींमधील भांडण सोडवणं शिक्षिकेला पडलं महागात, गाठावं लागलं हॉस्पिटल... title=
girl student fight teacher is knocked out cold by flying chair in classroom video get viral trending news today

Trending Video : सोशल मीडियावर सेकंद सेकंदाला काही ना काही पोस्ट किंवा शेअर होत असतात. यातील काही व्हिडीओ हे मनोरंजक असतात तर काही भयावह असतात. सोशल मीडियावर महिलांमध्ये मारामारी, शाळा कॉलेजमधील मुला मुलींची भांडणाचे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. अनेक वेळा हा व्हिडीओ इतके भयावह असतात की, नेटकऱ्यांच्या हृदयाचे ठोके चुकतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ पाहून संताप होतो आहे. (girl student fight teacher is knocked out cold by flying chair in classroom video get viral trending news today)

धक्कादायक व्हिडीओ 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता दोन विद्यार्थिनींमध्ये अतिशय भयानक वाद सुरु आहे. त्या एकमेकांनी खूप शिव्या देताना दिसत आहे. वर्गामध्ये सुरु असलेला हा प्रकार पाहून शिक्षिका त्यांच्यामधील वाद सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र त्या दोघींही काही पण ऐकण्याच्या मनस्तितीत नसतात. त्या एकमेकींवर आरडा ओरडा करताना दिसत आहे. त्यातील एक मुलगी अचानक हिंसक बनवते आणि वर्गात असलेली लोखंडी खुर्ची उचलून दुसऱ्या मुलीवर फेकते. 

हेसुद्धा वाचा - Video : लग्नाच्या दिवशी नवरीने वऱ्हाड्यांसह नवरदेवाच्या डोळ्यांवर बांधली काळी पट्टी, कारण जाणून बसेल धक्का

शिक्षिकेला गाठावं लागलं हॉस्पिटल

मात्र ती खुर्ची विद्यार्थिनीच्या बाजूला उभा असलेल्या शिक्षिकेच्या डोक्याला लागते आणि त्या खाली पडतात. धक्कदायक म्हणजे शिक्षिकेला खुर्ची लागून त्यांना गंभीर दुखापत झाली असतानाही त्या दोघी एकमेकींशी वाद घालणं सोडत नाही. ती शिक्षिका गंभीर अवस्थेत असून तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. 

ही धक्कादायक घटना मिशिगनमधील फ्लिंटमधील साउथवेस्टर्न क्लासिकल अकादमीमधील आहे. या घटनेनंतर शाळेच्या अधीक्षकांनी दोन्ही विद्यार्थिंनीच्या पालकांना या झालेल्या घटनेबद्दल सांगितलं आहे. मात्र त्या दोघींना शाळेतून काढण्यात आलं की नाही याबद्दल काही स्पष्ट समजलेलं नाही. दरम्यान हा व्हिडीओ ट्वीटर म्हणजे X वरील US Crimes या पेजवर शेअर करण्यात आला आहे.