Good Luck : कोणचं नशीब कधी झळकेल काही सांगू शकत नाही. आयुष्यात कधी आणि काय घडते हे काही सांगता येत नाही. असचं एका व्यक्तीसह घडले आहे. या व्यक्तीचे नशीब रातोरात पलटले आहे. अवघ्या 2000 रुपयांना विकत घेतलेली वस्तू विकून त्याने 51.50 लाखांना विकली आहे. ही वस्तु अत्यंत मौल्यवान असल्याने त्याला लाखमोलाची किंमत मिळाली आहे.
मिरर यूके वृत्तसंस्थेने याबाबते वृत्त दिले आहे. ब्रिटनमधील एका व्यक्तीने दुकानातून सुंदर नक्षीकाम केलेली दोन भांडी खरेदी केली होती. अवघ्या दोन हजार रुपयामध्ये त्याने ही दोन भांडी खरेदी केली होती. याच भांड्यानी त्याला लखपती बनवले आहे. दोन हजार रुपयाचा त्याला 25 पट जास्त मोबदला मिळाला आहे.
या व्यक्तीला कल्पना देखील नव्हती की त्याने खरेदी केलेली वस्तू इतकी मौल्यवान आहे. या व्यक्तीने पोर्सिलेनचे दोन जार खरेदी केले होते. या पांढऱ्या रंगाच्या जारवर सुंदर नक्षीकाम करण्यात आले होते. फुला पानांचे नक्षीकाम अतिशय सुंदर दिसते. याचे डिझाईन आवडल्यामुळे या व्यक्तीने बघताचक्षणी ही दोन्ही भांडी खरेदी. यासाठी त्याने दोन हजार रुपये दिले. मात्र, याच भांड्यानी त्याला लखपती बनवले आहे. लंडनमधील एका चॅरिटी शॉपमधून त्याने भांडी खरेदी केली होती.
या भांड्याना ऐतिहासिक महत्व आहे. 4.5 इंच उंची हे जार 18व्या शतकातील असल्याचा दावा केला जात आहे. राजवंशाच्या शाही भट्ट्यांमध्ये ही भांडी तयार करण्यात आली होती. या भांंड्यावर लाल, पिवळ्या, निळ्या फुलांचे तसेच पानांचे अतिशय नाजूक आणि सुंदर नक्षीकाम केलेले आहे. राजवंश हा चीनचा शेवटचा राजवंश होता.या रावंशाने 1644 ते 1912 पर्यंत चीनवर राज्य केले. त्याच्या कालखंडात या भांड्याचा वापर करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.
पोर्सिलेनपासून बनवलेली ही भांडी इतक्या महागात विकली जातील याची मला काहीच कल्पना नव्हती असं या व्यक्तीने सांगितले. प्राचीन वस्तुंचा लिलाव करणाऱ्या व्यक्तींशी बोलल्यावर या व्यक्तीला ही भांडी लाखमोलाची असल्याचे समजले. यानंतर लिलावात ही भांडी ठेवण्यात आली. लिलावार या प्राचीन भांड्यावर 51 लाख 50 हजार रुपये इतकी बोली लागली. एका झटक्यात हा व्यक्ती करोडपती झाला आहे.