मुंबई : बर्गरच्या इमोजीमध्ये चीझचा स्लाईस पॅटीसच्या वर ठेवावा की खाली हा गहन प्रश्न अनेकांना पडलाय.
इंटरनेटवर या प्रश्नाला घेऊन खूप चर्चा होत आहे. आता गूगलचे सीईओदेखील या डिबेटमध्ये उतरले आहेत.
काही दिवसांपूर्वी बॅकडल मीडियाचे संस्थापक थॉमस बॅकडल यांनी गुगल आणि अॅपलच्या 'बर्गर इमोजी'मधील फरक दाखवला होता. यानंतर ट्विटरवर या मुद्द्यावरून खूप चर्चा रंगली होती.
बॅकडल यांनी दाखवलेल्या चित्रांप्रमाणे अॅपलने पॅटीसच्या वर चिझ ठेवले आहे. तर गूगलच्या इमोजीमध्ये पॅटीसच्या खालच्या बाजूला चीझचा स्लाईस आहे. या दोन्हींपैकी कोणता चूक कोणता बरोबर हे ठरवण्याआधी पिचाईंनी त्यावर पडदा टाकताना खास ट्विट केले आहे.
Will drop everything else we are doing and address on Monday:) if folks can agree on the correct way to do this! https://t.co/dXRuZnX1Ag
— Sundar Pichai (@sundarpichai) October 29, 2017
सुंदर पिचाई म्हणतात, आता सारे विषय एका बाजूला ठेवूयात आणि सोमावारी कोण बरोबर ते ठरवूया' पिचाईंच्या ट्विटला १४ हजार लोकांनी रिट्विट केलं. दीड हजारांहून अधिक लोकांनी यावर प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत.