Google Pay वापरकर्त्यांना धक्का, मोफत सेवा होणार बंद

 गुगल पेेचे(Google Pay) आता पैसे ट्रान्सफर (Money Transfer) मोफत असणार नाहीय.

Updated: Nov 26, 2020, 08:20 AM IST
Google Pay वापरकर्त्यांना धक्का, मोफत सेवा होणार बंद

नवी दिल्ली : जर तुम्ही पैशांचा व्यवहार करण्यासाठी गुगल पेचा वापर करत असाल तर हा अलर्ट तुमच्यासाठी आहे. कारण गुगल पेेचे(Google Pay) आता पैसे ट्रान्सफर (Money Transfer) मोफत असणार नाहीय. बॅंक टू बॅंक पैसे ट्रान्सफर करण्यासाठी फीस आकारली जाणार आहे. कंपनीने यासाठी तयारी सुरु केली आहे. टेक साईड बिझनेस इनसाइडर यांनी यासंदर्भात माहिती दिली. 

जानेवारी २०२१ पासून पीयर टू पीयर पेमेंट सुविधा (Peer to Peer Payment Facility)  गुगल पेतर्फे बंद केली जाणार आहे. यासोबतच कंपनीतर्फे इस्टेट मनी ट्रान्सफर पेमेंट सिस्टिम जोडली जाणार आहे. यानंतर युजर्सला मनी ट्रान्सफर करण्यासाठी शुल्क द्यावे लागणार आहे. यासाठी किती चार्ज घेतला जाणार ? हे अद्याप कंपनीने स्पष्ट केले नाही.

गुगल वेब एप होणार बंद 

सध्या गुगल पे युजर्स मोबाईल एप किंवा वेब एपच्या माध्यमातून आपली सुविधा देतात. कंपनीने आपले वेब एप बंद करण्याची घोषणा केलीय. आता पैसे ट्रान्सफर करण्यासाठी  pay.google.com चा वापर करता येणार नाही. मनी ट्रान्सफर करण्यासाठी आता केवळ Google Pay एपचा वापर होऊ शकणार आहे. 

गुगल पेचे सपोर्ट पेज जानेवारीपासून बंद केले जाणार आहे. बॅंक अकाऊंटमधून पैसे पाठवताना एक ते तीन दिवस लागतात. तर डेबिट कार्डने ते तात्काळ ट्रान्सफर होतात. 

जेव्हा तुम्ही डेबिड कार्डहून पैसे ट्रान्सफर करता ते १.५ टक्के शुल्क लागतो. अशावेळी गुगलतर्फे इंस्टंट मनी ट्रान्सफरमध्ये (Instant Money Transfer) देखील शुल्क आकारु शकतात. हे सर्व फिचर्स अमेरिकी एंड्रॉइड (Android) आणि आयओएस (iOS) यूजर्ससाठी रोलआऊट केले गेलेयत. सोबतच गुगल पे लोगोमध्ये  (Logo) मध्ये देखील बदल केला जाणार आहे.