दीदी अशी हेवी ड्रायव्हर निघाली, व्हिडीओ पाहून तुमचा विश्वास बसणार नाही... एकादा हा व्हिडीओ पाहा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी दुचाकी चालवत असते, तेव्हा तिच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडतो.

Updated: Aug 2, 2022, 08:28 PM IST
दीदी अशी हेवी ड्रायव्हर निघाली, व्हिडीओ पाहून तुमचा विश्वास बसणार नाही... एकादा हा व्हिडीओ पाहा title=

मुंबई : सोशल मीडियावर आपल्यासमोर वेगवेगळे व्हिडीओ येत असतात. जे खूपच मनोरंजक असतात. ज्यामुळे आपला वेळ कसा निघून जातो हे देखील आपल्याला कळत नाही. सध्या एक असाच मनोरंजक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही. बाइक किंवा स्कूटी शिकताना प्रत्येकजण अति उत्साही असतो. परंतु ती चालवताना अती दक्षता घेणं जास्त महत्वाचं आहे. कारण गाडी चालवणे हा काही लहान मुलांचा खेळ नाही. हे आम्ही का बोलतोय हे तुम्हाला हा व्हिडीओ पाहून लक्षात येईलच.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी दुचाकी चालवत असते, तेव्हा तिच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडतो, जो पाहून तुम्हाला हसावं की, रडावं हे त्यामुलीची काळजी करावी हेच कळणार नाही.

खरंतर ही मुलगी दुचाकीवर बसलेली असताना, ती एक्सलेटरवर हात ठेवते, ज्यामुळे गाडी तिच्या नियंत्रणाबाहेर जाते, ज्यामुळे ती मुलगी गाडी घेऊन भलतीकडेच जाते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोशल मीडियावर या व्हिडीओची खूपच चर्चा होत आहेत, तर अनेक लोक या मुलीला पापाकी परी म्हणून देखील म्हणत आहेत. सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने गाडी चालवणाऱ्या लोकांने अनेक व्हिडीओ समोर येत असतात. त्यात आता आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे.

काही तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओला 22 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. त्याचवेळी, लोक व्हिडीओवर सतत मजेदार कमेंट करत आहेत.