Highest Paid Doctors in Quairading: आपल्यापैंकी सगळ्यांनाच असे वाटतं असते की आपली सॅलरी ही सगळ्यांपेक्षा जास्त असावी. सध्याच्या जमान्यात महागाई आणि इतर कारणांमुळे आणि सोबतच आपल्या गरजा इतक्या झपाट्यानं वाढतायत की आपल्याला पैशांची नितांत गरज निर्माण झाली आहे तेव्हा आपल्यासाठी आता सॅलरीही (Salary in Australia) तितकीच महत्त्वाची झाली आहे. काहींना कमी पगारातच काही गोष्टी भागवाव्या लागतात तर काहींना इतका पगार असतो की त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. पण जगात असं एक ठिकाण आहे जिथे डॉक्टर पेशाची सॅलरी ऐकून तुमची झोपच उडेल. हो, इथल्या डॉक्टरांना चक्क महिन्याला 6 कोटी रूपये मिळतात. तुम्हाला जाणून घेऊन आश्चर्य वाटले असेलच परंतु यामागील कारणंही तितकेच गंभीर आहे.
ऑस्ट्रेलियाच्या (Australia) पश्चिम भागाकडील व्हिटबेल्टमधले क्वायरडिंग (Quairading) शहरातील डॉक्टरांना महिन्याला 8,00,000 डॉलर म्हणजेच 6,56,00,490 रूपयांचा पगार मिळतो. त्याचसोबतच चार बेडरूमचं घर तेही मोफत आणि अनेक सवलती मिळत आहेत. तुम्हाला जाणून घेऊन फार आश्चर्य वाटलं असेलच की डॉक्टरांना इतक्या मोठ्या प्रमाणात सवलती कशा काय मिळत आहेत. हो, हे खरं आहे. परंतु इथल्या डॉक्टरांना हे सगळं अगदी नाईलाजास्वस्त मिळत आहेत. येथे स्थानिक पातळीवर सलग अनेक महिने वैद्यकीय सेवा मिळत नसल्यानं इथल्या नगर परिषदेनं घोषित केलं आहे.
ऑस्ट्रेलियातील अनेक छोट्या छोट्या शहरांमध्ये वैद्यकीय सुविधा नाही. काही ठिकाणी तर अनेक वैद्यकीय सेवा (Medical Services in Australia) बंद होण्याच्या मार्गावर आहे. इथल्या प्रेसिडेंट पीटर स्मिथ यांनी सांगितले की, आमच्या डॉक्टर आहेत परंतु मेडिकल सेवा नाही. त्यामुळे आम्ही वैद्यकीय सेवा मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील आहोत. येथे केवळ 4.5 टक्के लोकंच काम करायला तयार आहेत बाकी 14 टक्के लोकांनाच या शहरातून डॉक्टर व्हायचंय.
इथल्या सर्वच कर्मचारी आणि स्टाफसाठी हे भलमोठं पॅकेज दिलं आहे. या सॅलरीसोबत त्यांना बोनस आणि इन्सेन्टिव्हजही (Bonus and Incentives) आहेत. जर कोणी या शहरात दोनपेक्षा जास्त दिवस राहण्याचा निर्णय घेत असतील तर त्यांना जास्तीची 12,000 डॉलर म्हणजेच 9.94 लाख रूपयांची सॅलरी आणि जर का त्यांना या शहरात पाच वर्षांहूनही अधिक काळ झाला असेल तर ते 23,000 डॉलर म्हणजेच 19.05 रूपयांचा बोनस मिळतो. येथे फक्त 619 लोकच राहतात परंतु इथे डॉक्टरांना चांगली सेवा पुरवणे कठीण होत आहे.