Spain Same Sex Couple: मातृत्व हे जगातील सर्वात मोठ सुख मानले जाते. गर्भातच बाळाची नाळ आईशी जोडली जाते. मात्र, एक बाळाची नाळ गर्भातच दोन मातांशी जोडली गेली असे सांगितले तर आश्चर्य वाटेल ना? एक बाळ आणि दोन गर्भ... जगात पहिल्यांदाचा अशी आश्चर्यकारक प्रसूती झाली आहे. स्पेनमध्ये पहिल्यांदाच एका समलिंगी जोडप्याने मुलाला जन्म दिला आहे.
युरोपच्या इतिहासात पहिल्यांदाच समलिंगी जोडप्याने बाळाला जन्म दिला आहे. मेट्रो या वेब पोर्टटने याबाबतचे वृत्त दिले आहे. डेरेक एलॉय असे बाळाचे नाव आहे. 30 ऑक्टोबर रोजी पाल्मा, मेजोर्का, स्पेन येथे या बाळाचा जन्म झाला. 30 वर्षीय एस्टेफानिया आणि 27 वर्षांच्या अजहारा या समलैंगिक जोडप्याचे हे बाळ आहे. अजहाराने बाळाला नऊ महिने आपल्या पोटात वाढवले. मात्र, त्याला जन्म देणारी अंडी एस्टेफानियाच्या गर्भातून अजहाराच्या गर्भात ट्रान्सफर करण्यात आली.
जगातील ही पहिली आश्चर्यकारक प्रसूती वैद्यकीय क्षेत्राचा चमत्कार देखील मानला जात आहे. या जोडप्याने स्पेनमधील एका प्रजनन क्लिनिकच्या मदतीने यावर्षी मार्चमध्ये पालक होण्याचा प्रवास सुरू केला. पालक होण्यासाठी यांनी INVOCell नावाचे प्रजनन तंत्रज्ञानाची मदत घेण्याचा निर्णय घेतला. INVOCell हे इंट्राव्हॅजाइनल कल्चर (IVC) द्वारे बाळ निर्माण करण्याचे तंत्रज्ञान आहे. यासाठी एस्टेफानियाच्या योनीमध्ये अंडी आणि शुक्राणूंची एक कॅप्सूल ठेण्यात आली. अंडी आणि शुक्राणूंची कॅप्सूल 5 दिवसांपर्यंत एस्टेफानियाच्या योनीमध्ये होती. याद्वारे नैसर्गिकरित्या गर्भधारणा करण्यात आली. यानंतर हा गर्भ अजहाराच्या गर्भात ट्रान्सफर करण्यात आला.
अजहाराच्या गर्भाशयात गर्भ हस्तांतरित करण्यापूर्वी भ्रूणांची तपासणी करण्यात आली. अझहराने नऊ महिने गर्भ पोटात वाढवला. 30 ऑक्टोबर रोजी यांच्या बाळाचा जन्म झाला. डेरेक एलॉय असे नाव त्यांनी या बाळाचे ठेवले. INVOCell तंत्रज्ञानाच्या मदतीने गर्भधरणा करुन बाळाचा जन्म होई पर्यंत या जोडप्याला संपूर्ण प्रक्रियेत 4,57,909 रुपयांपेक्षा जास्त खर्च आला. INVOCell तंत्रज्ञानामुळे गर्भ वाढत असताना भ्रूण शेअर करणे देखील शक्य असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दोन विवाहित महिला एकाच मुलाला जन्म देणाऱ्या जगातील पहिल्या महिला ठरल्या आहेत.