मुलाच्या मित्रासोबत तिला नको त्या अवस्थेत पकडलं, नंतर नवऱ्याने असं काही केलं की...

नवरा बायकोच्या सुखी संसारात तिसऱ्या व्यक्तीच्या येण्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. असे अनेक प्रकरणं आपल्याला ऐकायला मिळतात. कधी कधी या गोष्टींमुळे घटस्फोट होतो. एका व्यक्तीलाही अशाच परिस्थितीतून जावं लागलं. जेव्हा त्याने आपल्या पत्नीला वेगळ्याच व्यक्तीसोबत संबंध ठेवताना रंगेहाथ पकडले.

Updated: May 20, 2022, 01:31 PM IST
मुलाच्या मित्रासोबत तिला नको त्या अवस्थेत पकडलं, नंतर नवऱ्याने असं काही केलं की... title=

वॉशिंग्टन : नवरा बायकोच्या सुखी संसारात तिसऱ्या व्यक्तीच्या येण्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. असे अनेक प्रकरणं आपल्याला ऐकायला मिळतात. कधी या गोष्टींमुळे घटस्फोट होतो. तर कधी मुलांच्या भविष्याचा विचार करून जोडप्यांना एकत्र राहवं लागतं. अमेरिकेत राहणाऱ्या एका व्यक्तीलाही अशाच परिस्थितीतून जावं लागलं. जेव्हा त्याने आपल्या पत्नीला तिसऱ्या व्यक्तीसोबत संबंध ठेवताना रंगेहाथ पकडले.

'द सन'च्या रिपोर्टनुसार, या अमेरिकन व्यक्तीने स्वतः सोशल स्पेसवर आपली संपूर्ण कहाणी सांगितली आहे. या व्यक्तीचे म्हणणे आहे की, त्याच्या पत्नीचे तिसऱ्या व्यक्तीसोबत शारीरिक संबंध आहेत. दुःखाची गोष्ट म्हणजे ती व्यक्ती दुसरी कोणी नसून त्याच्या मुलाचा मित्र आहे. तो मित्र त्यांच्या घरी नेहमीच येत जात असे.

असा आला प्रकार उघडकीस

त्या महिलेचा पती म्हणाला 'आमचा मुलगा 27 वर्षांचा आहे आणि आम्ही दोघे 52 वर्षांचे आहोत. माझ्या पत्नीला पार्टी करायला आवडते आणि दर शुक्रवारी तिच्या मित्रांसोबत नाईट आउट करायला जाते.

दरम्यान, तिचे आमच्या मुलाच्या मित्रासोबत अफेअर सुरू झाले. मी प्रशिक्षणासाठी बाहेर गेलो असताना हा प्रकार घडला. पण कोरोनामुळे मला हॉटेल मध्येच सोडावे लागले आणि मी अचानक परत आल्यानंतर सर्व माझ्या डोळ्यांनी पाहिले.'

त्या व्यक्तीने पुढे सांगितले की, तो घरी पोहोचताच त्याने पाहिले की त्याची पत्नी मुलाच्या मित्राशी रोमान्स करत आहे. 

त्याला प्रचंड राग आला, पण मुलाच्या भविष्याचा विचार करून त्याने पत्नीला सोडले नाही आणि घटना गुप्त राहू दिली. 

त्याच्यासाठी हा मोठा धक्का होता. परंतू मुलाच्या भविष्यासाठी सगळं विसरून पुढे जाण्याचा निर्णय घेतला.