तो वर्कआऊट करणाऱ्या मुलीचा गुपचुप व्हिडिओ काढत होता, आणि...

तिने त्या व्यक्तीविरुद्ध जिमच्या असिस्टंट ऑपरेशन मॅनेजरकडे तक्रारही केली.

Updated: Nov 24, 2021, 06:21 PM IST
 तो वर्कआऊट करणाऱ्या मुलीचा गुपचुप व्हिडिओ काढत होता, आणि...

मुंबई :  तुम्ही जिममध्ये गेलात, तर तुम्हाला कळेल की, काही वेळा लोक तिथेही तुमचे व्हिडिओ शूट करतात. त्यानंतर ते त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करतात. एक मुलगी वर्कआउट करत असताना असा प्रकार घडला आहे.

तिला तिचा वर्कआउट व्यवस्थित करता यावा म्हणून ती स्वत: चा व्हिडिओ शूट करत होती. मात्र याचदरम्यान एक व्यक्ती गुपचूप तिचा व्हिडिओ रेकॉर्ड करत होता.

हा व्हिडिओ शूट करत असताना ती एकटी नसल्याचे तिने पाहिले. तर एक मुलगा दुरूनच गुपचूप तिचा व्हिडिओ बनवत आहे. तिने या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ तिच्या टिकटॉकवर टाकला आहे, ज्याला बातमी लिहिपर्यंत 20 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

तिने त्या व्यक्तीविरुद्ध जिमच्या असिस्टंट ऑपरेशन मॅनेजरकडे तक्रारही केली. लवकरच त्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले आहे.

हा व्हिडिओ युएसए मधला असून सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. अनेकजण या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत.