Expressway वर दोन कारमध्ये भीषण अपघात, व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये ही घटना एका मोठ्या हायवेवरील असल्याचे दिसत आहे.

Updated: Nov 24, 2021, 05:25 PM IST
Expressway वर दोन कारमध्ये भीषण अपघात, व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

मुंबई : सोशल मीडिया हे असे प्लॅटफॉर्म आहे जेथे कधी काय ट्रेंडवर येईल (Trending) हे सांगता येत नाही. येथे लोकांना रातोरात प्रसिद्धी मिळते. येथे अनेक प्रकारचे कंटेन्ट आपल्याला पाहायला मिळतात. काही मनोरंजक, सायन्स, फॅशन, होम डेकोर संबंधीत अनेक व्हिडीओ येथे उपलब्ध असतात. परंतु आपल्याला सोशल मीडियावरती अनेकदा अपघातांचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात, जे खूप भयानक असतात. सोशल मीडियावर असाच एक भयानक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. लोक त्यांच्या धक्कादायक प्रतिक्रिया देखील शेअर करत आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये ही घटना एका मोठ्या हायवेवरील असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ कारमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने रेकॉर्ड केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, समोरून एक कार येत आहे. जी जोरात दुसऱ्या कारला धडकते.

दोन्ही गाड्यांमध्ये एवढी भीषण टक्कर होते की, हा व्हिडीओ पाहून सगळेच थक्क झाले आहेत. काही क्षणांनंतर एक दुसरी विचित्र घटना घडते. वास्तविक, व्हिडीओमध्ये, जी कार आदळल्यानंतर उलटते, ती रस्त्यावरून येणाऱ्या दुसऱ्या कारच्या वर जाऊन पडते. परंतु त्या कारला काहीच होत नाही. उलट ती कार काही मीटरपर्यंत या कारला घेऊन पुढे येता आणि थांबते.

हा व्हिडीओ पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत, लोकं या व्हिडीओवर आपापल्या आश्चर्यकारक प्रतिक्रिया शेअर करत आहेत. व्हायरल होत असलेला व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.

तुम्ही सर्वजण हा व्हिडीओ प्रोटेस्ट न्यूजच्या पेजवर पाहू शकता. हा व्हिडीओ शेअर करताना पेजच्या ऍडमिनने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'शेवटपर्यंत पाहा' या व्हिडीओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि हजारो कमेंट्स मिळत आहेत.

लोकांच्या प्रतिक्रियांबद्दल बोलताना एका यूजरने कमेंट करत लिहिले की, 'अॅक्सिडंट झाल्यानंतर इतक्या लगेच रस्ता साफ केल्याचं मी पहिल्यांदाच पाहिलं आहे, मला या सफेद कार चालकाला बक्षीस द्यावेसे वाटते.' तर दुसर्‍या यूजरने लिहिले, 'असा व्हिडीओ याआधी कधीच पाहिला नाही, पांढऱ्या रंगाची कार पूर्णपणे सुरक्षित आहे'. तर तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, 'मला जाणून घ्यायचे आहे की, हा व्हिडीओ कोणी काढला.'