तब्बल 13000 अश्लील व्हिडीओ, हार्ड ड्राईव्ह बायकोच्या हाती लागली अन्... बदलापूरनंतर धक्कादायक घटना!

Indian Doctor Arrested in America : एकीकडे बदलापूरच्या घटनेने देशभरात खळबळ उडाली असताना आता अमेरिकेतील भारतीय डॉक्टरचा धक्कादायक प्रताप समोर आला आहे. 

सौरभ तळेकर | Updated: Aug 21, 2024, 07:34 PM IST
तब्बल 13000 अश्लील व्हिडीओ, हार्ड ड्राईव्ह बायकोच्या हाती लागली अन्... बदलापूरनंतर धक्कादायक घटना! title=
Indian Doctor Arrested in America

Indian Doctor Taking obscene Videos : राज्यात दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसतेय. चिमुकल्या मुलीही नराधमांच्या वासनेचा शिकार होत आहेत. बदलापूरच्या घटनेनंतर तर शाळेतील मुलीही सुरक्षित नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. मुंबईतील नागपाड्यातही अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आलाय. विक्रेत्याकडून 8 वर्षाच्या मुलीचा विनयभंग करण्यात आला. या नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. मात्र, राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा कधी मार्गी लागणार? असा सवाल विचारला जात आहे. अशातच आता भारतीय डॉक्टरने अमेरिकेत केलेल्या अश्लील कृत्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला आहे.

अमेरिकन पोलिसांनी 8 ऑगस्ट रोजी एका 40 वर्षांच्या भारतीय डॉक्टरला अटक केली आहे. अटक केलेल्या भारतीय डॉक्टरचं नाव ओमेर एजाज असं आहे. ओमेर एजाजवर लहान मुले आणि महिलांचे नग्न व्हिडिओ बनवल्याचा आरोप आहे. दोन वर्षांतील मुलांचे आणि महिलांचे शेकडो नग्न फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड केल्याने पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करत अटक केली आहे. मात्र, हे प्रकरण दुसरं तिसरं कोणी नाही तर स्वत:च्या बायकोने उघडकीस आणलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपी डॉक्टरने कथितपणे बाथरूम, चेंजिंग एरिया, हॉस्पिटल रूम आणि अगदी घरात देखील छुपे कॅमेरे लावले होते. आरोपी डॉक्टरने बेशुद्धावस्थेत किंवा झोपलेल्या अनेक महिलांसोबत लैंगिक संबंध ठेवत होता, असा खुलासा करण्यात आला आहे. 

झालं असं की, पत्नीला आपल्या नवऱ्यावर संशय होता. पतीचं एक्स्ट्रा मॅरेटियल अफेअर असल्याचा संशय बळावल्याने पत्नीने तपास सुरू केला. त्यावेळी पत्नीच्या हाती एक हार्ड ड्राईव्ह सापडली. पत्नीने हार्ड ड्राईव्ह चेक केल्यानंतर तिला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. आपला पती अश्लील कृत्य करत असल्याचं लक्षात येतात तिने धाडसी निर्णय घेतला अन् थेट पोलिसांना कळवलं. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली अन् आरोपी डॉक्टरला अटक केली. 

दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून आरोपी डॉक्टरचं हे कृत्य सुरू होतं, अशी माहिती पोलिसांनी दिलीये. अत्याचार इतका व्यापक आहे आणि विकृती खूप मोठी आहे. आम्ही आणखी खोलात जाऊन तपास करत असून तातडीने कारवाई केली जात आहे, असं पोलिसांनी सांगितलं आहे. हा आरोपी डॉक्टर 2011 मध्ये भारतातून वर्क व्हिसावरून अमेरिकेत गेला होता. त्यानंतर त्याने नागरिकत्व मिळवलं.