Millionaire After Meteor Crash: कुणाचं नशिब कधी फळफळेल काय सांगू शकत नाही. असाच अनुभव इंडोनेशियातील एका व्यक्तीला आला आहे. अवकाशातून एक रहस्यमयी वस्तू या व्यक्तीच्या घरावर पडली, रातोरात हा माणूस करोडपती बनला. या रहस्यमयी वस्तुच्या विक्रितून या व्यक्तीला करोडो रुपये मिळाले आहेत.
जोशुआ हुतागालुंग असे या व्यक्तीचे नाव आहे. जोशुआ इंडोनेशियातील कोलांगचा रहिवासी आहे. त्याच्या घरावर अंतराळातून एक दगड पडला होता. हा दगड म्हणजे उल्कापिंड आहे. एक तज्ञाने ही उल्का खरेदी करुन त्याच्या बदल्यात जोशुआ याला करोडो रुपये दिले आहेत.
जोशुआ घराबाहेर काम करत असताना आकाशातून मोठा दगड त्याच्या घरावर पडला. पृथ्वीच्या दिशेने ही उल्का इतक्या प्रचंड वेगाने आली की 15 सेमी खड्डा तयार झाला. ही उल्का 4.5 अब्ज वर्षे जुनी असल्याचे तपासात आढळून आले आहे. उल्काच्या या तुकड्याचे वजन 2.1 किलो इतके आहे. हे अत्यंत दुर्मिळ CM1/2 कार्बोनेशियस कॉन्ड्राईट म्हणून ओळखले जाते. ही विशेष प्रकारची उल्का आहे.
2.1 किलो वजनाचा उल्काचा हा तुकडा तब्बल 14 कोटी रुपयांना विकला गेला. जोशुआ याला 30 वर्षांच्या पगाराएवढी किंमत या उल्काच्या विक्रीतुन मिळाली आहे. हुतागालुंग येथील तज्ज्ञाने उल्काचा हा तुकडा संशोधनासाठी खरेदी केला. जोशुआ याच्या घराजवळ असा प्रकारच्या उल्काचे 3 तुकडे सापडले आहेत.
एकीकडे चांद्रयान-3च्या यशाची चर्चा सुरु असतानाच नासालाही एका अंतराळ मोहीमेत मोठं यश आलंय. बेन्नू नावाच्या उल्केवरील दगड आणि धुळीचे नमुने पृथ्वीवर आणण्यात नासाला यश मिळालंय. नासाच्या ऑसिरिस-रेक्स अवकाशयानातून पृथ्वीच्या कक्षेत 63 हजार मैलांवर हे नमुने सोडण्यात आले. सुमारे 250 ग्रॅमचे हे नमुने आहेत. उल्का, अंतराळातील वातावरण, सूर्यमाला यासंबंधीच्या संशोधनात उल्केवरील दगड आणि धुळीचे नमुने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. 8 सप्टेंबर 2016 मध्ये ऑसिरिक्स-रेक्स अंतराळायानाचा प्रवास सुरु झाला होता. तब्बल 7 वर्षांनी अंतराळातून धूळ आणि दगडाचे नमुने या यानानं पृथ्वीवर पाठवलेत.
वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात. यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.
...Read More|
SRH
(20 ov) 194/9
|
VS |
CSK
184/8(20 ov)
|
| Sunrisers Hyderabad beat Chennai Super Kings by 10 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
RCB
(20 ov) 175/8
|
VS |
DC
179/4(19.5 ov)
|
| Delhi Capitals beat Royal Challengers Bengaluru by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
KKR
(20 ov) 180
|
VS |
GT
181/5(19.4 ov)
|
| Gujarat Titans beat Kolkata Knight Riders by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.