मुंबई : कुठल्याही नात्यात विश्वास अत्यंत महत्वाचा असतो. विश्वासावरचं नात टिकतं. संशय हा नात्याला हळू हळू संपवतो. परंतू वैवाहीक जिवनात असे बरेच प्रसंग येतात की तेव्हा आपला पार्टनर आपल्याला फसवत तर नाहीना अशी पाल मनात चुतचुकते.. अश्या वेळी तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही ही भन्नाट ट्रिक वापरून तुमचा संशय खरा-खोटा करू शकता.. आम्ही तुम्हाल दाखवणार आहोत एक अशी डिवाईज की त्याने तुम्ही तुमच्या पार्टनरवर करडी नजर ठेवू शकता.
काय आहे डिवाईज ?
GPS ट्रॅकींग डिवाईज हे एक छोटंसं उपकरण आहे जे तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या कारमध्ये किंवा बाईकमध्ये इन्टॉल करू शकता. हे डिवाईज तुमचा तीसरा डोळा म्हणून काम करेल.
बाजारात अशी अनेक प्रकारची GPS ट्रॅकिंग उपकरणं उपलब्ध आहेत, जी तुम्ही सहज विकत घेवू शकता.. GPS ट्रॅकींग डिवाईज बाईक किंबा कारमध्ये लावलं की तुम्हाला जोडीदाराचं लाइव्ह लोकेशन मिळेल. एवढेच नाही तर हे डिवाईज तुम्हाला गाडी कुठे कुठे फिरली त्याची हिस्ट्रीही दाखवेल. यामुळे तुमचा पार्टनर कुठे जातो काय करतो याबाबत सर्व माहिती तुम्हाला मिळेल.
किती असेल किंमत ?
ही GPS ट्रॅकिंग उपकरणं फार महाग नाहीत. असे उपकरण तुम्ही ऑनलाइन कोणत्याही बेवसाईटवरून मिळवू शकता. 1000-1200 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करू शकता. GPS ट्रॅकींग डिवाईज वेगवेगळ्या फिचरसह त्याची किंमत कमी जास्त होते. लाखांमध्ये किंमत असलेले ट्रॅकिंग डिवाईजही उपलब्ध आहे. तुमच्या उपयुक्ततेनुसार तुम्ही घेवू शकता.
आणखी काय होईल उपयोग ?
तुम्ही डिव्हाइस किती महाग आणि कोणत्या वैशिष्ट्यांसह खरेदी करता हे तुमच्यावर अवलंबून आहे. हे उपकरण चोरांपासून कारचे संरक्षण देखील करते आणि जर चोराने तुमची कार चोरण्याचा प्रयत्न केला तर ते तुम्हाला आधीच सावध करते.. त्यामुळे तुमची कार सुरक्षीतही राहील आणि तुमच्या पार्टनरचा खरा चेहराही तुमच्या समोर येईलय