इस्त्रायलने बॉम्बहल्ले थांबवले, नागरिकांकडे फक्त 3 तासांची मुदत; गाझा पट्टीत सुरु झालं डोअर टू डोअर ऑपरेशन

इस्त्रायल सध्या युद्धाच्या अंतिम टप्प्यावर आहे. दरम्यान इस्त्रायलने नागरकांना गाझामधून बाहेर पडण्यासाठी 3 तासांचा वेळ दिला आहे. इस्त्रायलचं लष्कर IDF ने गाझामधील नागरिकांना उत्तर गाझातून दक्षिणेकडे जाण्यासाठी 3 ताासांचा वेळ दिला आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 15, 2023, 03:21 PM IST
इस्त्रायलने बॉम्बहल्ले थांबवले, नागरिकांकडे फक्त 3 तासांची मुदत; गाझा पट्टीत सुरु झालं डोअर टू डोअर ऑपरेशन title=

इस्त्रायल आणि हमास यांच्यात गेल्या एका आठवड्यापासून संघर्ष सुरु आहे. इस्त्रायलने याआधीच हमासला मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा दिला असल्याने माघार घेण्याच्या मनस्थितीत नाही. यादरम्यान, इस्त्रायल युद्धाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. इस्त्रायलने गाझामधील नागरिकांना 3 तासांची वेळ दिली आहे. इस्त्रायलचं लष्कर IDF ने गाझामधील नागरिकांना उत्तर गाझातून दक्षिणेकडे जाण्यासाठी 3 ताासांचा वेळ दिला आहे. 

IDF कडून नागरिकांना घर सोडून जाण्यासाठी मुदत

आयडीएफने म्हटलं आहे की, "आम्ही तुम्हाला सांगू इच्छित आहोत की, आयडीएफ सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत या मार्गावर कोणतंही ऑपरेशन करणार नाही. यादरम्यान कृपया उत्तर गाझामधून दक्षिणेकडे जा. निघण्याची संधी आहे तोपर्यंत जावा. तुमची आणि तुमच्या कुटुंबाची सुरक्षा महत्त्वाची आहे. कृपया आमच्या आदेशाचं पालन करा आणि दक्षिणेकडे निघा. तुम्ही निश्चिंत राहा. हमास नेत्यांनी आधीच त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेची व्यवस्था केली आहे".

इस्त्रायलचं लष्कर गाझा पट्टीत दाखल

इस्त्रायल आणि हमासमधील युद्ध सुरु होऊन एक आठवडा झाला आहे. हमासचा खात्मा करण्याच्या उद्धिष्टाने इस्त्रालय सैन्य गाझामध्ये दाखल झालं आहे. इस्त्रायल लष्कराचे टँक आणि शस्त्रधारी वाहनं सतत गाझाच्या सीमेवर दाखल होत आहेत. इस्त्रायलला आता कोणत्याही स्थितीत गाझा पट्टीचा ताबा मिळवायचा आहे. याचसाठी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू शनिवारी गाझा पट्टीच्या बाहेर जवानांना भेटण्यासाठी पोहोचले होते. इस्त्रायलने हमासला मुळापासून नष्ट करण्याची शपथच खाल्ली आहे. आयडीएफने गाझाच्या चारही बाजूंना 3 लाख सैनिकांना तैनात केलं आहे. 

हमासचे 1900 जण ठार

एका आठवड्यापासून सुरु असलेल्या या युद्धात इस्त्रायलच्या 1300 लोकांचा मृत्यू झाला असून, 2800 जण जखमी झाले आहेत. तर हमासच्या 1900 जणांचा मृत्यू झाला असून, 8000 जण जखमी आहेत. इस्त्रायलने आतापर्यंत 6000 पेक्षा अधिक हवाई हल्ले केले आहेत. तर हमासच्या हल्ल्यांची संख्या 3000 असल्याचं सांगितलं जात आहे. इस्त्रायल रोज 700 रॉकेट हल्ले करत आहे. तर हमासची संख्या 400 आहे.