Al Jazeera Live Jets Strike Video : इस्रायल आणि हमास (Israel vs hamas) यांच्यात घनघोर युद्ध सुरू झालंय. हमासच्या हल्ल्यात इस्रायलची पुरती दाणादाण उडाली. सुमारे 300 हून अधिक इस्रायली नागरिकांचा बळी गेलाय. त्यामुळंच आता इस्रायल देखील पेटून उठलंय. इस्रायलनं ऑपरेशन आयर्न स्वॉर्डची घोषणा केली. त्यानुसार इस्रायली सैन्यानं रातोरात हमासला मुँह तोड जबाब देण्यास सुरूवात केली आहे. त्याची काही थरारक दृष्य आता समोर येत आहेत. अशातच अल जझिरा चॅनेलच्या लाईव्ह (Al Jazeera Live) प्रक्षेपणात धक्कादायक दृष्य समोर आलंय.
इस्रायलने दे दणादण रॉकेट हल्ले करून गाझा पट्टीची पुरती चाळण करून टाकली. हमासचा कब्जा असलेले शेकडो तळ नेस्तनाबूत करण्यात आलेत. अत्याधुनिक शस्त्रांसह सुसज्ज इस्रायली सैन्यदलानं दुश्मनांचा खात्मा करण्यास सुरूवात केलीय. त्याचाच प्रत्यय अल जझिरा चॅनेलच्या लाईव्हमध्ये पहायला मिळाला. नेमकं काय झालं? पाहुया...
अल जझिरा चॅनेलचं लाईव्ह प्रक्षेपण सुरू होतं. त्यावेळी युमना अल सय्यद या युद्धपरिस्थितीत रिपोर्टिंग करत होत्या. त्यावेळी त्या हमासच्या मिलिट्री कमांडरच्या वक्तव्याचं रिपोर्टिंग करत होत्या. त्याचवेळी इस्त्रायली लढाऊ विमानांनी पॅलेस्टाईन टॉवरवर हल्ला केला अन् क्षणात बिल्डिंग उधवस्थ झाली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. इस्त्रायलने यावेळी अनेक भागात हल्ला सुरू केला. त्यामुळे रिपोर्टरला देखील सुरक्षित भागात हलवण्यात आलंय.
Watch the moment Israeli fighter jets strike Palestine Tower behind Al Jazeera’s Youmna El Sayed as she reports live from Gaza pic.twitter.com/dXHVRJiCOC
— Al Jazeera English (@AJEnglish) October 7, 2023
दरम्यान, हमासही हातावर हात ठेवून गप्प बसलेला नाही. हमासनंही रात्रभर बॉम्बगोळे फेकून पलटवार केला. आकाशातून तुटणारे हे तारे नाहीत, हा आहे हमासचा रॉकेट हल्ला. रात्रभरात अशी 150 हून अधिक रॉकेट्स इस्रायलवर डागण्यात आली. या हल्ल्यातून वाचण्यासाठी इस्रायलनं एअर डिफेन्स सिस्टीम आयर्न डोम अॅक्टिव केला. हमासची रॉकेट हवेतच नष्ट करायला सुरूवात केली.