PM मेलोनी यांची खिल्ली उडवणाऱ्या महिला पत्रकाराला विसरता येणार नाही अशी शिक्षा; कोर्टानं...

Italian journalist fined €5K: इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या उंचीवरुन त्यांची खिल्ली उडवणाऱ्या महिला पत्रकाराला कोर्टाने शिक्षा सुनावली आहे.  

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 19, 2024, 10:48 AM IST
PM मेलोनी यांची खिल्ली उडवणाऱ्या महिला पत्रकाराला विसरता येणार नाही अशी शिक्षा; कोर्टानं... title=
Italian journalist fined for ridiculing PM Giorgia Meloni's height

Italian journalist fined €5K: देशाच्या पंतप्रधानांची खिल्ली उडवलीप्रकरणी इटलीच्या एका महिला पत्रकारावर खटला दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी कोर्टाने आता महिला पत्रकाराला दंड ठोठावला आहे. इटलीतील मिलान येथील कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे. एका महिला पत्रकाराने इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची खिल्ली उडवली होती. गिउलिया कोर्टेस असं या महिला पत्रकाराचे नाव आहे. 

कोर्टेसने ऑक्टोबर 2021 साली मेलोनी यांच्या उंचीवरुन एक वादग्रस्त ट्विट केलं होतं. त्यासाठीदेखील त्यांना आता 1200 यूरो (109336) रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कारण या ट्विटमधून त्यांनी बॉडी शेमिंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोर्टाच्या या निर्णयावर कोर्टेस यांनी गुरुवारी एक्सवरुन टिकादेखील केली होती. इटलीच्या सरकारला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि पत्रकारितेची परवानगी नाकारणे ही खूप मोठी गंभीर समस्या आहे. 

काय घडलं होतं?

2021 साली हे प्रकरण घडलं होतं. त्यावेळी मेलोनी यांचा ब्रदर्स ऑफ इटली पक्ष विरोधीपक्ष होता. कोर्टेसने नेते बेनिटो मुसोलिनी यांच्यासोबत मेलोनी यांचा एक अक्षेपार्ह फेक फोटो पोस्ट केला. तसंच, कमेंटमध्ये म्हटलं होतं की, मला घाबरवू नका जॉर्जिया मेलोनी. तुमची उंची फक्त 4 फुट आहे. मी तुम्हाला पाहूही शकत नाहीये.' कोर्टेसच्या या ट्विट आणि पोस्टवर मेलोनी यांनी आक्षेप व्यक्त केला होता.

कोर्टेसच्या या ट्विटविरोधात मेलोनी यांनी कोर्टात खटला दाखल केला होता. त्यानंतर आता कोर्टाने कोर्टेस यांना दंड ठोठावला आहे. कोर्टाच्या आदेशानुसार, कोर्टेस यांना 5000  यूरो (4,55,569) रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. न्यूज एजन्सी आणि स्थानिक मीडिया रिपोर्टमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. पंतप्रधान मेलोनी दंडाची रक्कम एका चॅरीटीला दान करणार आहेत, अशी माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे. 

कोर्टेस या देखील या शिक्षेविरोधात कोर्टात अपील करु शकतात. त्यांनी एक ट्विटदेखील केलं आहे. ही वेळ इटलीतील स्वतंत्र्य पत्रकारांसाठी खूप कठिण आहे. आम्ही चांगल्या दिवसांची वाट पाहू पण हार मानणार नाही, असं त्यांनी ट्विट केलं आहे. 

याआधीही पत्रकारांना भरावा लागला होता दंड

विदाउट बोर्डसने 2024 वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये इटलीला पाचव्या स्थानावरुन थेट 46 वे स्थान मिळाले आहे. या आधी मागील वर्षी रोमच्या एका कोर्टाने लेखक रॉबर्टो सविआनोवर 1,000 यूरोंचा दंड ठोठावण्यात आला होता. त्यांच्या 2021मध्ये मेलोनी यांचा ट्वीव्हीवर अपमान करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.