जॉन्सन बेबी पाउडरमुळे होतो कॅन्सर, कंपनीवर हजारो कोटींचा दंड

धक्कादायक गोष्ट आली समोर

Updated: Jul 16, 2018, 11:38 AM IST
जॉन्सन बेबी पाउडरमुळे होतो कॅन्सर, कंपनीवर हजारो कोटींचा दंड title=

नवी दिल्ली : अनेक लोकं रोजच्या वापरात असलेल्या वस्तूंबाबत निष्काळजीपणे वागतात. पण आपल्या मुलांच्या बाबतीत अनेक जण खूपच काळजीपणे गोष्टी हाताळत असतात. पालक मुलांना कोणत्याच गोष्टीची कमी पडू देत नाहीत. अशातच लहान मुलांना लागणारी प्रत्येक गोष्ट पालक ब्रँडेड आहेत का याचा शोध घेतात. पण अशीच एक ब्रँड असलेली जॉनसन अँड जॉनसन कंपनीची पाउडर तुम्ही तुमच्या मुलाला लावत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच धक्कादायक आहे. या पाउडरमुळे कॅन्सर होत असल्याची अनेक महिलांनी तक्रार केली आहे. अमेरिकेच्या सेंट लुई न्यायालयात हे मान्य झालं आहे की या पाउडरच्या वापरामुळे गर्भाशयाचा कॅन्सर होतो. सोबतच न्यायालयाने कंपनीला 4.69 अरब डॉलर म्हणजेच जवळपास 32,000 कोटींचा दंड देखील ठोठावला आहे.

दूसरीकडे जॉनसन अँड जॉनसनने म्हटलं की, त्यांच्या पाउरमध्ये एस्बेस्टस किंवा कॅन्सर होईल असे कोणतेही तत्व नाही. या निर्णयाविरोधात ते याचिका दाखल करतील. कंपनीने म्हटलं की, त्यांची पाउडर सुरक्षित आहे. याआधीही अशा प्रकारचे निर्णय उच्च न्यायालयाने तांत्रिक आणि कायद्याच्या आधारावर बदलले आहेत.

या प्रकरणात एकूण 22 पीडित महिलांचा आरोप होता की, जॉनसन बेबी पाउडरमध्ये असलेल्या एसबेस्टसमुळे त्यांना गर्भाशयाचा कॅऩ्सर झाला. महिलांनी म्हटलं की, कंपनीने लोकांना याबाबत काहीही सांगितलं नाही की त्यांच्या पाउडरमध्ये एस्बेस्टस आहे. याबाबतीत ते अपयशी ठरले. एस्बेस्टसमुळे महिलांना ओवेरियन कॅन्सर झाला. यामुळे 6 महिलांचा मृत्यू देखील झाला आहे.' पाउडरमुळे झालेल्या आजारावर न्यायालयाने दिलेली ही सर्वात मोठी मदत असल्याचं बोललं जात आहे.

न्यायालयात सादर करण्यात आलेल्या पुराव्यांनंतर वैज्ञानिकांना पाउडरमध्ये काही हानिकारक तत्व असल्याची चिंता दर्शवली आहे. पण कंपनीच्या लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. कंपनीवर याआधीही असे आरोप झाले आहेत. कंपनीवर याआधीही दंड ठोठावण्यात आला होता पण यावेळी सर्वाधिक दंड ठोठावण्यात आला आहे.