सारं जग ज्याच्यावर फिदा, तो जस्टिन बीबर भारतीय ढोल वादकाच्या प्रेमात; पाहिला का त्याचा Video?

या व्हिडीओने कॅनडाचा पॉप गायक जस्टिन बीबरचेही (Justin Bieber) लक्ष वेधून घेतलं आहे. 

Updated: Aug 3, 2022, 12:28 PM IST
सारं जग ज्याच्यावर फिदा, तो जस्टिन बीबर भारतीय ढोल वादकाच्या प्रेमात; पाहिला का त्याचा Video? title=
justin bieber shared the indian drummer video of jagrataon social media in marathi

Justin Bieber Shared Indian Video - सोशल मीडियावर आपण अनेक वेगवेगळे व्हिडीओ पाहत असतो. ज्यातील काही व्हिडीओ आपलं लक्ष वेधून घेतात. जर एखाद्या व्हिडीओ हा जर कुठल्या प्रसिद्ध व्यक्तीचे लक्ष वेधून घेत असतात. सोशल मीडियावर असाच भारतीयाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. विशेष म्हणजे आपल्या गाण्यांनी सर्वांना वेड लावणारा जस्टिन बीबर देखील या भारतीय वादकाच्या प्रेमात पडला आहे. हा व्हिडीओने कॅनडाचा पॉप गायक जस्टिन बीबरचेही (Justin Bieber) लक्ष वेधून घेतलं आहे. हा व्हिडीओ पाहून जस्टिन आश्चर्यचकित झाला असून त्याने हा व्हिडीओ त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. काय आहे या व्हिडीओमध्ये तुम्हालाही जाणून घ्यायचे आहे ना. ( justin bieber shared the indian drummer video of jagrataon social media in marathi)

काय आहे व्हिडीओमध्ये?

या व्हिडीओ माताच्या जागरणाचा ( Jagrata) कार्यक्रमाचा आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, या जागरणात भक्त आजूबाजूला नाचत आहे. या जागरण दरम्यान एक व्यक्ती सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं. या व्हिडीओमध्ये ढोल वाजवताना एक व्यक्ती वारंवार उड्या मारताना दिसत आहे. या ढोलकी वादकाची वाजवण्याची शैली कार्यक्रमातील अनेकांना आपल्याकडे आकर्षित करत आहेत. या कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 

जस्टिन बीबरने 'हा' व्हिडीओ शेअर केला

जस्टिन बीबरने त्याचा इंस्टाग्राम (Justin Bieber Instagram)स्टोरीमध्ये हा व्हिडीओ शेअर केला आहे. एवढंच नाही तर बीबरने आपला मित्र आणि ड्रमर डेव्हन टेलरला टॅगही केलं आहे. बीबरने टेलरला टॅग करत लिहिलं आहे की, ''@stixxtaylor, मी तुमच्याकडून अशा कार्यक्रमाची अपेक्षा ठेवतो.'' नेटिझन्सना देखील हा व्हिडीओ खूप आवडला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत  20.4 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर या व्हिडीओला 9 लाखांपेक्षा जास्त लाइक मिळाले आहेत. 

कमेंट सेक्शनमध्ये अनेक यूजर्सने वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिलं आहे की, ''जस्टिन बीबरनेही असंच काहीतरी कारावं.'' तर दुसरा युजर म्हणतो, ''तुमच्या कामाचा तुम्ही पण असा आनंद घ्या.''