अफगाण स्त्रियांची असहायता आणि हे दृश्य पाहून ब्रिटीश लष्कर सैनिकांना आपले अश्रू अनावर

Afghanistan crisis : तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानवर (Afghanistan) ताबा मिळविण्यास सुरुवात केल्यानंतर अवघ्या काही दिवसातच काबूलवर (Kabul) चाल करत देश ताब्यात घेतला. 

Updated: Aug 20, 2021, 07:52 AM IST
अफगाण स्त्रियांची असहायता आणि हे दृश्य पाहून ब्रिटीश लष्कर सैनिकांना आपले अश्रू अनावर title=

काबूल : Afghanistan crisis : तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानवर (Afghanistan) ताबा मिळविण्यास सुरुवात केल्यानंतर अवघ्या काही दिवसातच काबूलवर (Kabul) चाल करत देश ताब्यात घेतला. त्याआधीच (Afghanistan) राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी  (Ashraf Ghani) आपल्या जवळच्या 51 लोकांसह देश सोडून पळून गेलेत. मात्र, काबूलने देश ताब्यात घेतल्यानंत अफगाण नागरिक भीतीने देश सोडून जाण्याच्या तयारीत विमानतळावर पोहोचले. मात्र, तेथील अराजकतेची स्थिती पाहून अनेकांना आपले अश्रु आवरता आले नाही. ब्रिटीश सैनिकही भावूक झाल्याचे पाहायला मिळालेत. (Afghan women fear for future as Taliban seizes control of Kabul)

अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा ताबा मिळाल्यानंतर काबूल विमानतळावर चेंगराचेंगरी झाली आहे. कोणीतरी त्यांना देशाबाहेर नेईल या आशेने मोठ्या संख्येने अफगाणी विमानतळावर पोहोचत होते. महिला आणि मुलांसह हजारो लोक काबूल विमानतळाच्या बाहेर उपस्थित जमले होते. सगळीकडे आरडा-ओरडा सुरू होता. एकच गोंधळाची परिस्थिती होती. कोणाला काय करावे हेच समजत नव्हते. अफगाण स्त्रिया हंबरडा देऊन रडत रडत अमेरिकन आणि ब्रिटीश सैनिकांपुढे  (US and British Troops) स्वत:चा जीव वाचवण्यासाठी भीक मागत होत्या. हे दृश्य पाहून कणखर सैनिकांचेही डोळे पाणावले. त्यांचे अश्रू थांबत नव्हते. ब्रिटीश लष्कराचे सैनिकही भावूक झाल्याचे पाहायला मिळालेत.  

महिला प्राण वाचवण्यासाठी भीक मागत होत्या

'द सन'च्या अहवालानुसार, काबूल विमानतळ सध्या अमेरिकन आणि ब्रिटिश सैन्याने (US and British Troops) व्यापलेले आहे, तर बाहेर तालिबानी तैनात आहेत. अफगाणिस्तान सोडण्याच्या आशेने विमानतळावर येणाऱ्या महिलांची अवस्था सर्वात वाईट झाली आहे. अफगाण महिला सैनिकांना आपला जीव वाचवण्यासाठी रडत रडत दया मागत आहेत, पण सैनिकांना प्रत्येक व्यक्तीला मदत करणे शक्य नाही. या असहायतेमुळे सैनिक देखील दु:खी झाले आहेत आणि त्यांचे दु:ख अश्रूंच्या स्वरूपात बाहेर पडत आहे.

Soldier च्या डोळ्यात अश्रू 

अफगाण स्त्रियांनाही त्यांचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्या मुलांना इतरांच्या स्वाधीन करणे भाग पडले आहे. विमानतळाच्या गेटवर महिला काटेरी तारांच्यावरून त्या आपल्या चिमुकल्यांना सैनिकांकडे फेकत आहेत. बुधवारी जेव्हा एका महिलेने आपल्या लहान मुलीला तारांवर फेकून दिले, तेव्हा तिला दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या ब्रिटिश सैनिकाने पकडले. आईची ही लाचारी पाहून ब्रिटीश सैनिकांच्या डोळ्यातही अश्रू आले.

'माझ्या बाळाला वाचवा'

एका ब्रिटीश अधिकाऱ्याने सांगितले की, महिलांना इतकी भीती वाटते की ते आपल्या मुलांना ब्रिटीश आणि अमेरिकन सैनिकांकडे काटेरी तारांवर फेकत आहेत, जेणेकरून त्यांचे प्राण वाचू शकतील. गर्दीतील एका महिलेने 'माझ्या बाळाला वाचवा' असे मोठ्याने ओरडली आणि नंतर तिला आमच्या दिशेने फेकले. सुदैवाने, आमच्या सैनिकाने शेवटच्या क्षणी मुलाला पकडले आणि त्याचा जीव वाचला.

प्रत्येकाला सैनिकांना मदत करायची आहे

अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, अशी एकही व्यक्ती नाही जी दु:ख, असहायता आणि भीतीचे हे दृश्य पाहून रडलेली नाही. विमानतळावर तैनात सैनिकांचे डोळे पाणावले दिसून आले आहेत. त्यांना सर्वांना मदत करायची आहे, पण ते शक्य होऊ शकत नाही. विमानतळावर रडत असलेल्या एका अमेरिकन सैनिकाला जेव्हा एका महिलेने आपले बाळ दिले तेव्हा त्यांनी घेण्यास नकार देऊ शकले नाहीत. सुमारे 800 ब्रिटिश आणि 5000 अमेरिकन सैनिक सध्या काबूल विमानतळावर तैनात आहेत. आपापल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढल्यानंतर सर्वजण येथून परत जातील. तथापि, त्यानी पाहिलेली ही असहायता आणि वेदनांचे दृश्य ते विसरू शकत नाही.