अमेरिकेत काश्मीर हिंदूंनी पंतप्रधान मोदींकडे केली मागणी

 काश्मीरी पंडितांना आंतरिकदृष्ट्या विस्थापित म्हणून मान्यता द्या, अशी मागणी काश्मिरी हिंदूच्या एका समुहाने रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली आहे.  तसेच काश्मीरी पंडितांनी काश्मीर खोऱ्यात सोडून आलेल्या संपत्तीची काळजी घेतली जाईल आणि अवैधपणे कब्जा केलेल्यांना त्या संपत्तीतून हद्दपार केले जाईल, असेही यात नमूद करण्यात आले. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 26, 2017, 04:08 PM IST
अमेरिकेत काश्मीर हिंदूंनी पंतप्रधान मोदींकडे केली मागणी  title=

वॉशिंग्टन :  काश्मीरी पंडितांना आंतरिकदृष्ट्या विस्थापित म्हणून मान्यता द्या, अशी मागणी काश्मिरी हिंदूच्या एका समुहाने रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली आहे.  तसेच काश्मीरी पंडितांनी काश्मीर खोऱ्यात सोडून आलेल्या संपत्तीची काळजी घेतली जाईल आणि अवैधपणे कब्जा केलेल्यांना त्या संपत्तीतून हद्दपार केले जाईल, असेही यात नमूद करण्यात आले. 
 
 काश्मीरी हिंदू फाउंडेशनने पंतप्रधान मोदींना एक निवेदन दिले. त्यात काश्मिरी हिंदूंना आंतरिकदृष्ट्या विस्थापित घोषीत करण्याची मागणी केली तसेच या संदर्भात एक घोषणापत्र काढण्याची मागणी केली आहे. तसेच या संदर्भात एक योजना आणली पाहिजे. तसेच काश्मीरी हिंदूंनी सोडून गेलेल्या संपत्तीची देखरेख केली पाहिजे. तसेच अवैध कब्जा करणाऱ्या तेथून हद्दपार केले पाहिजे. तसेच ज्या हिंदूंनी दबावात संपत्तीच्या विक्री दस्ताऐवजावर हस्ताक्षर करण्यासाठी भाग पाडण्यात आले होते. त्यांनीही यात समाविष्ठ करण्यात आले. 
 
 फ्लोरिडामध्ये राहणारे फाउंडेशनचे प्रमुख दीपक गंजू यांनी सांगितले की, आमचे प्रार्थना स्थळ जाळून टाकण्यात आले. त्या ठिकाणी तोडफोड करण्यात आली. नुकसान करण्यात आले. आम्ही भारत सरकार आणि राज्य सरकार यांना विनंती करतो की, काश्मीर खोऱ्यातील आमच्या सांस्कृतिक संस्थांची सुरक्षा आणि संरक्षण केले पाहिजे. 
 
 सुमारे चार लाख काश्मिरी पंडितांना सामुहिक पद्धतीने काश्मीर सोडण्यासाठी भाग पाडण्यात आले. सुमारे १२०० लोकांची हत्या झाली,  असेही गंजू यांनी सांगितले.