डॉ. हरबर्ट क्लेबर यांच्या सन्मानार्थ गूगलचे खास डूडल

जाणून घ्या कोण आहेत डॉ. हरबर्ट क्लेबर

Updated: Oct 1, 2019, 08:17 AM IST
डॉ. हरबर्ट क्लेबर यांच्या सन्मानार्थ गूगलचे खास डूडल title=

मुंबई : मानसशास्त्रज्ञ आणि व्यसनमुक्ती करण्यात अभूतपूर्व यश मिळवणारे डॉ. हरबर्ट क्लेबर यांच्या सन्मानार्थ त्यांना गूगलकडून आजचे डूडल समर्पित करण्यात आले आहे. त्यांच्या 'नॅशनल अकॅडमी ऑफ मेडिसिन'च्या २३व्या वर्धापन दिनानिमित्त हा सन्मान करण्यात आला आहे. हे डूडल मॅसेच्युसेट्समधील जॅरेट जे. क्रोसोज्का यांनी तयार केले आहे.

डूडलमध्ये एक डॉक्टर आणि रुग्ण दिसत आहे. डॉक्टर रुग्णाची समस्या जाणून घेताना दिसत आहेत. रुग्णाच्या मागे काही चित्रांमधून व्यक्ती नशेतून मुक्त होताना दिसत आहेत.

डॉक्टर क्लेबर यांनी, व्यक्तीला नशेची सवय का लागते आणि यापासून कशाप्रकारे सुटका केली जाऊ शकते याचा शोध लावण्याचा प्रयत्न केला.  

डॉ. हरबर्ट क्लेबर यांचा जन्म १९ जून १९३४ रोजी झाला. त्यांनी येल विद्यापिठात ड्रग्स डिपेंडन्स यूनिटची स्थापना केली.

डॉ. क्लेबर यांना अमेरिकेतील सर्वोत्तम मानसशास्त्रज्ञांपैकी एक मानले जाते. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानितही करण्यात आले आहे.