उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग-ऊनची रहस्यमयी दुनिया

जगातला वेगळा देश म्हणून उत्तर कोरियाची ओळख आहे. 

Updated: Jun 28, 2018, 08:18 PM IST
उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग-ऊनची रहस्यमयी दुनिया title=

प्योनगँग : जगातला वेगळा देश म्हणून उत्तर कोरियाची ओळख आहे. जगातल्या इतर देशांशी उत्तर कोरियाचं नातं सीमित आहे. या देशामध्ये नागरिकांवर अनेक प्रकारचे निर्बंध आहेत. या देशाचा हुकूमशाहा किम जोंग-ऊनची दुनियाही रहस्यमयीच आहे. किम जोंग-ऊन काय करतो आणि कोणाला भेटतो याची माहिती काही खास अधिकाऱ्यांनाच असते. आंतरराष्ट्रीय पातळीवर आता किम जोंगच्या आयुष्याबद्दलच्या गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. किम जोंगनं सध्याच्या काळात जिकडे प्रवास केला तिकडे वेगवेगळ्या वाहनांचा उपयोग केला आहे.

किम जोंगचं विमान

किम जोंगनं आत्तापर्यंत तीनवेळा चीनचा दौरा केला आहे. सत्ता सांभाळल्यानंतर किम जोंग पहिल्यांदा चीनला विमानानं गेला. ज्या विमानानं किम जोंग चीनला गेला ते विमान रशियामध्ये बनवण्यात आलं आहे. द इल्यूशिन-62 (II-62)या विमानानं किम जोंग चीनला गेला. किम जोंगचं हे विमान पांढरं असून त्याच्या बाहेरच्या बाजूला कोरियन भाषेत मोठ्या अक्षरांमध्ये उत्तर कोरिया लिहिण्यात आलं आहे. तसंच या विमानावर उत्तर कोरियाचा झेंडाही आहे. विमानाच्या मागच्या भागावर निळ्या आणि लाल रंगाच्यामध्ये एक चांदणी आहे.

किम जोंग-उन, Kim Jong-Un, Kim Jong-Un train, Kim jong plane, Mysterious wife, Kim jong mysterious life

किम जोंगच्या विमानाच्या आतमध्ये अत्याधुनिक सुविधा आहेत. या विमानात किम जोंग काम करतो तसंच बैठकाही घेतो. विमानात किम जोंगचे काही फोटोही आहेत. हे विमान फेब्रुवारी महिन्यात चर्चेत आलं. उत्तर कोरियाचं ऑलम्पिक प्रतिनिधी मंडळ दक्षिण कोरियाला गेलं होतं. यामध्ये किम जोंगची बहिण किम यो-जोंगही होती.

किम जोंगचे वडिल किम जोंग इल आणि त्याचे आजोबा किम-II विमानाची भीती असल्यामुळे विमान प्रवास करायचे नाहीत. पण किम जोंग-उन मात्र विमान प्रवासाला घाबरत नाही. २०१५ साली उत्तर कोरियाच्या सरकारी वृत्त वाहिनीवर किम जोंगचे स्वदेशी विमान आणि दोन पंखाच्या एएन-२ मिलट्री विमान उडवतानाचे व्हिडिओ समोर आले.

किम जोंगची 'द बिग ट्रेन'

मार्चमध्ये किम जोंग चीनच्या दौऱ्यावर गेला होता त्यावेळी एक खास ट्रेननं किम जोंग तिकडे पोहोचला होता. ही तिच ट्रेन आहे ज्याचा किम जोंगच्या वडिलांनी डिसेंबर २०११ मध्ये मृत्यू आधी परदेश दौऱ्यांसाठी वापर केला होता. हिरव्या रंगाच्या या ट्रेनवर पिवळ्या रंगाची पट्टी आहे. या ट्रेनचे फोटो चीनच्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले होते. यानंतर लोकांनी किम जोंगच्या या ट्रेनची तुलना त्याचे वडिल किम जोंग इलच्या ट्रेनशी केली होती.

काय आहे किम जोंगच्या ट्रेनमध्ये?

किम जोंगच्या या ट्रेनमध्ये जवळपास ९० डब्बे आहेत. यामध्ये कॉन्फरन्स रूम, ऑडियन्स चेंबर, बेडरूम आणि सॅटलाईट फोन-टीव्ही कनेक्शन आहे. उत्तर कोरियातल्या एका रिपोर्टनुसार किम जोंग इलचा मृत्यूही याच ट्रेनमध्ये झाला होता. या ट्रेनमध्ये जगातली सगळ्यात महाग वाईन मिळायची. तसंच ट्रेनमध्ये शानदार पार्टीही होत असे. किम जोंग इलनं या ट्रेननं जवळपास १०-१२ दौरे केले. यामध्ये सर्वाधिक दौरे चीनचे होते.

किम जोंग-उन, Kim Jong-Un, Kim Jong-Un train, Kim jong plane, Mysterious wife, Kim jong mysterious life

९० डब्ब्यांची बुलेटप्रुफ ट्रेन

९० डब्ब्यांच्या या ट्रेनचा प्रत्येक डबा बुलेटप्रुफ आहे. सामान्य रेल्वे डब्ब्यापेक्षा या ट्रेनच्या डब्ब्याचं वजन खूप जास्त आहे. जास्त वजन असल्यामुळे या ट्रेनचा वेग कमी आहे. या ट्रेनसा सर्वाधिक वेग ३७ मैल प्रतितास आहे. २००९ सालच्या रिपोर्टनुसार किम जोंग इलच्या काळामध्ये या ट्रेनमध्ये १०० सुरक्षा अधिकारी असायचे. स्टेशनचा तपास करण्याचं मुख्य काम या अधिकाऱ्यांकडे असायचं. याचबरोबर सुरक्षेसाठी या ट्रेनच्या वरून सैन्याचं हेलिकॉप्टर आणि विमानही जायची.

किमची स्वत:ची २२ स्टेशन

उत्तर कोरियामध्ये किमची स्वत:ची २२ स्टेशन आहेत. या स्टेशनचा उपयोग फक्त किम जोंग उनच करतो. २०१५ साली किम जोंग उन याच ट्रेनच्या एका डब्ब्यात मोठ्या पांढऱ्या टेबलवर बसलेला दिसला होता.

किम जोंग-उन, Kim Jong-Un, Kim Jong-Un train, Kim jong plane, Mysterious wife, Kim jong mysterious life

किम जोंग-उनची मर्सिडीज बेंज

चीन आणि सिंगापूर दौऱ्यावर असताना किम जोंग-उननं एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी स्वत:च्या मर्सिडीज बेंज एस क्लास या गाडीचा वापर केला होता. ही गाडी खास किम जोंगसाठी तयार करण्यात आली आहे. २०१० साली ही गाडी बनवण्यात आली होती. या गाडीवर जवळपास १२ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. कोरियाच्या शिखर संमेलनादरम्यान या गाडीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. लांबच्या दौऱ्यांमध्ये अडचण होऊ नये म्हणून किम जोंगच्या ताफ्यात एक टॉयलेट कारही असते.

बोट आणि पाणबुड्या

उत्तर कोरियामध्ये किम जोंगला अनेकवेळा बोट, पाणबुडी, बस आणि स्की लिफ्टनं प्रवास करताना बघण्यात आलं आहे. मे २०१३ मध्ये जेव्हा सरकारी माध्यमांनी किम जोंग उनची फिशिंग स्टेशनवरचा फोटो छापला होता तेव्हा किम जोंगच्या मागे एक बोट दिसली होती. जवळपास ४७ कोटी रुपयांची ही बोट किम जोंगची आहे का नाही याबाबत मात्र कोणतीही माहिती मिळालेली नाही. 

किम जोंग-उन, Kim Jong-Un, Kim Jong-Un train, Kim jong plane, Mysterious wife, Kim jong mysterious life

किम जोंगचं पोर्टेबल टॉयलेट

सिंगापूरमध्ये अमेरिकेसोबत शिखर परिषदेसाठी आलेल्या किम जोंग यांची सोय जरी सेंट रेगीस या पंचतारांकीत हॉटेलमध्ये झाली होती तरी त्यांनी स्वतः सोबत स्वतःचं पोर्टेबल टॉयलेट आणलं होतं. असंच टॉयलेट त्यांनी याआधी दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांना भेटतानाही सोबत नेलं होतं. एवढंच नाही तर अगदी उत्तर कोरियातही फिरताना ते स्वतःचं टॉयलेट घेऊन जातात. स्वतःच्या विष्ठेतून त्यांच्या आयुष्यातली गुपीतं परदेशी गुप्तहेर शोधून काढतील अशी भीती त्यांना वाटते. त्यांना असलेल्या विकारांचा याद्वारे शत्रूंना शोध लागला तर त्याचा गैरफायदा घेतला जाईल अशी भीती त्यांना सतावते. म्हणून किम जोंग ऊन जिथे जातात तिथे त्यांचं स्वतःचं टॉयलेटच घेऊन जातात.